Paytm Tips: QR कोडला होम स्क्रीनवर कसे ॲड करायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
Paytm हे देशातील एक लोकप्रिय ऑनलाईन पेमेंट ॲप आहे. यावर आतापर्यंत लाखो युजर्स जोडले गेले आहेत. इथे युजर्स कोणत्याही गोष्टीचे पेमेंट सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या फोनमधूनच करू शकतात. Paytm ने Android स्मार्टफोन युजर्ससाठी ‘Receive Money QR विजेट’ लाँच केले आहे. या नवीन फीचरच्या मदतीने ऑनलाइन पैसे मिळवणे सोपे होणार आहे.
हे फिचर फोनच्या होम स्क्रीनवर प्लेस QR कोडच्या मदतीने पैसे रिसिव्ह करण्यास अनुमती देते. यापूर्वी, तुम्हाला QR कोड आधारित पैसे मिळवण्यासाठी पेटीएम ॲप ओपन लागत होते. यानंतर, क्यूआर कोड दाखवावा लागला, परंतु आता तुम्ही तुमच्या फोनच्या होम स्क्रीनवर क्यूआर कोड जोडू शकाल. याआधी ऑनलाइन पैसे रिसिव्ह करण्यासाठी क्यूआर कोडचा स्क्रीनशॉट घ्यावा लागत होता. पण आता यूजरला स्क्रीनशॉट घेण्याची गरज नाही, कारण पेटीएमने यासाठी वेगळे फीचर दिले आहे. हे फिचर तुमच्या रोजच्या जीवनात फार कामी येईल, हे तुमच्या पेमेंटच्या प्रक्रियेला आणखीन सुकर करेल.
सावधान! या धोकादायक ॲप्स डाउनलोड करताच तुमचे बँक अकाउंट होईल रिकामे, FBI ने जारी केला अलर्ट
पेटीएम कॉइन ड्रॉप साउंड लाँच
कंपनीने सांगितले की, या फीचरला चांगला प्रतिसाद मिळाल्यास हे फीचर iOS यूजर्ससाठी आणले जाईल. या वैशिष्ट्याचा किराणा दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांसह सर्व व्यवसाय मालकांना फायदा होईल. याशिवाय, कंपनीने Quoit Drop Sound लाँच केले आहे, जे तुम्हाला रिअल-टाइम पेमेंट पावतीची सूचना देईल.
होम स्क्रीनवर पेटीएम क्यूआर विजेट कसे जोडावे
Gmail Tips: हॅकर्स पण वाचू नाही शकणार तुमचा सिक्रेट ई-मेल, Mail करण्यापूर्वी ही सेटिंग करा
Paytm लहान व्यवहारांसाठी UPI Lite, UPI वर रुपे क्रेडिट कार्ड लिंकिंग आणि ऑटो-पे सर्व्हिस देते. पेटीएम भारतात UAE, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस, भूतान, श्रीलंका आणि नेपाळ यांसारख्या देशांसह उपलब्ध करून देण्यात आले आहे.