पंजाब नतंर सगळ्या देशाच्याच डोक्याला ताप ठरलेला कट्टरवादी अमृतपाल सिंग (Amritpal Singh) सध्या पंजाबमधून पळून गेला आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे शक्त ते सगळे प्रयत्न सुरू असताना एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गेल्या 11 दिवसांपासून फरार असलेला अमृतपाल सिंग अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील अकाल तख्तवर जाऊन आत्मसमर्पण करण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरू आहे.
[read_also content=”खेळाच्या मैदानावर डान्स करणाऱ्या परदेशी मुली कशा बनतात चीअर लीडर्स? त्यांना पगार किती मिळतो? माहितीये का… https://www.navarashtra.com/india/how-do-foreign-girls-who-dance-on-the-playground-become-cheerleaders-nrps-379317.html”]
या माहितीमुळे अमृतपाल सिंग पंजाबमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पंजाब पोलीस सतर्क झाले आहेत. सुवर्ण मंदिराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शेकडो पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
याआधी पंजाब पोलिसांना मंगळवारी अमृतपाल होशियारपूरमध्ये लपल्याची माहिती मिळाली होती. फगवाडा येथे एका अज्ञात वाहनाचा पाठलाग पोलिसांनी केला, त्यात अमृतपाल असल्याचा संशय आला. या गाडीत बसलेले लोक गाडी सोडून मार्निया येथील गुरुद्वाराजवळ पळून गेले. यानंतर मारनियान गावात आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अमृतपालला पकडण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा घरोघरी जाऊन कारवाई केली होती. दरम्यान,
पंजाब पोलिसांचे इंटेलिजन्स युनिट फगवाडा येथूनच अमृतपालच्या पंजाब क्रमांक इनोव्हा वाहनाचा (पीबी 10 सीके 0527) पाठलाग करत होते. चालकाने कार चालवली आणि होशियारपूर जिल्ह्यातील मरनाईया गावातील गुरुद्वारामध्ये प्रवेश केला. त्यानंतर वाहन चालत्या अवस्थेत सोडून वाहनातील दोन्ही संशयित भिंत उडी मारून पळून गेले. अमृतपाल पुन्हा एकदा पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याच्यासोबत त्याचा साथीदार पप्पलप्रीत आणि एक साथीदारही पळून गेला.
खलिस्तानचे समर्थन करणारा ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख अमृतपालअटक वॉरंट जारी झाल्यापासून फरार आहे. पंजाब पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून अमृतपाल सिंगचा शोध घेत आहेत. तो नेपाळमध्ये (Nepal) लपल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, अमृतपालला जर त्याने भारतीय पासपोर्ट किंवा इतर कोणताही बनावट पासपोर्ट वापरून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी भारताने नेपाळकडे केली होती.