संग्रहित फोटो
पहिली घटना काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, ४१ वर्षीय सौमिता गौतम सावु (वय ४१, रा. हांडेवाडी) या विवाहितेने बाल्कनीतून खाली उडी मारून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती गौतम विभुतीभुषण सावु (वय ४५) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दसऱ्याच्या दिवशी घडली असल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सौमिता व गौतम यांचा २०१२ मध्ये विवाह झाला होता. ते हांडेवाडी परिसरात राहण्यास होते. सौमिता एका स्कूलमध्ये नोकरी करत होत्या. तर, पती देखील मोठ्या कंपनीत नोकरी करतो. त्यांना १४ वर्षांचा एक मुलगा आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कौटुंबिक वादविवाद सुरू होते. पती गौतम हा सौमिता यांना सातत्याने घटस्फोट द्यावा, अशी मागणी करत होता. तसेच, त्यावरून त्यांचा छळ करत होता. या छळाला कंटाळून सौमिता यांनी दसऱ्याच्या दिवशी (दि. २० ऑक्टोंबर) बाल्कनीतून खाली उडी मारून आपले आयुष्य संपविले. अधिक तपास उपनिरीक्षक संदीप राऊत हे करत आहेत.
हे सुद्धा वाचा : आधी पिकअप अंगावर घातली, नंतर दगडाने ठेचले; पंढरपूर तालुक्यात तरुणाचा खून
दुसरी घटना चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. २३ वर्षीय विवाहिता प्रियंका सुरेश कांबळे हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पती सुरेश शिवाजीराव कांबळे (वय २६, रा. वडगावशेरी) याला अटक केली आहे. सुरेश आणि प्रियंका यांचा २०२४ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांनीच पती सुरेश याने व सासू, नणंद व इतरांनी आपआपसात संगणमत करून तिला माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तिला सतत टोचून बोलून तिचा मानसिक व शारिरीक छळ केला. या छळाला कंटाळून प्रियंका हिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. अधिक सहाय्यक निरीक्षक वर्षा बांबे या करत आहेत.
Ans: एका प्रकरणात माहेरून पैशांची मागणी करून छळ केल्याचा, तर दुसऱ्या प्रकरणात लग्नाच्या १२ वर्षांनंतर घटस्फोटाची मागणी करून छळ केल्याचा आरोप आहे.
Ans: दोन्ही घटनांमध्ये संबंधित विवाहितांच्या पतींना पोलिसांनी अटक केली आहे.
Ans: या दोन्ही घटना पुणे शहरात घडल्या असून, संबंधित प्रकरणांत पोलिसांनी पतींना अटक केली आहे.






