संग्रहित फोटो
प्राथमिक माहितीनुसार, अनैतिक संबंधाच्या संशयातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. संशयिताने विष्णू जाधव यांच्या अंगावर पीकअप गाडी घातली. त्यानंतर मोठ्या दगडाने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जाधव यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी कैलास रामा बाबर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, खुनामागील नेमके कारण, घटनेची पार्श्वभूमी आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. अनैतिक संबंधाच्या संशयातूनच हा खून झाला का, याची तपास करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा : ५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?
एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला
महाविद्यालयातील भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून चौघांनी एलएलबीच्या विद्यार्थ्याला अडवून चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या उजव्या हाताच्या बोटांना, तर त्याचा मित्रावरही चाकूने वार करुन गंभीर दुखापत करण्यात आली आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार १७ ऑक्टोबर रोजी दुपारी एन-६ सिडकोतील सैलानी बाबा व्हील अलाइनमेंट सेंटरसमोर घडला आहे. हर्ष राठोड, स्वप्नील राठोड, संकेत राठोड, सोन्या अशी चाकू हल्ला करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रितमसिंग देविचंद बारवाल (वय २२, रा. भगतसिंगनगर, हसुल) याने फिर्याद दिली आहे.
हे सुद्धा वाचा : दुचाकी चोरीच्या टोळीचा अखेर पर्दाफाश; ५० सीसीटीव्हींच्या मदतीने तिघांना पकडले
Ans: विष्णू ज्ञानेश्वर जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे.
Ans: पंढरपूर तालुक्यातील सरकोली परिसरात ही घटना घडली.
Ans: कैलास रामा बाबर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.






