मुंबई : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातील (Punjabi Singer Siddhu Moose Wala) आणखी आरोपींची धरपकड सुरु आहे. आरोपी कुख्यात गुंड दीपक कुमार (Deepak Kumar) ऊर्फ टिणू याच्या मैत्रिणीला मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) रविवारी रात्री पंजाब पोलिसांनी (Punjab Police) अटक केली. भारतातून मालदीवमध्ये (Maldive) पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दीपकच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी अटकेची माहिती दिली.
आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य टिनू पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. पंजाब पोलिसांचा दावा आहे, की पकडलेल्या मुलीने गुंड टिनूला पळून जाण्यास मदत केली होती. तसेच, इतर आरोपींना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांचे सांगितले. मात्र टिनू भारतात आहे की अन्य कोणत्या देशात, याचा पोलीस शोध घेत आहेत.
Major breakthrough in Deepak Tinu custody escape, #AGTF @PunjabPoliceInd arrested woman accomplice of Tinu from #MumbaiAirport in an intelligence-based ops. She was with criminal when he escaped & was on way to #Maldives when nabbed. Further #investigations to nab Tinu underway pic.twitter.com/R30OAGdDqi — DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) October 9, 2022
टीनू लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असून, सिद्धू मुसेवाला हत्याकांडात पोलीस त्याला चौकशीसाठी ताब्यात घेत होते. कपूरथळा तुरुंगात टिनू शिक्षा भोगत होता. मुसेवाला हत्याप्रकरणाच्या नियोजनातील शेवटचे फोनवरील संभाषण २७ मे रोजी लॉरेन्स आणि टिनू यांच्यात झाले होते. सिद्धूची २९ मे रोजी हत्या झाली होती. दीपक याच्यावर पंजाब, हरियाना, राजस्थान आणि दिल्लीसह विविध राज्यांमध्ये ३४ पेभा अधिक गुन्हे दाखल आहेत.