खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई, लोन रिकव्हरी करणाऱ्या कॉल सेंटरवर धाड, तिघांना अटक
मोबाईल ॲपवर लोन घेतलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मित्रांना शेजारच्यांना फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडल्या होत्या. चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी पुन्हा देखील दाखल झाला होता. एका महिलेला रिकव्हरी एजंटने फोनवर शिवीगाळ केली होती. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेला आलेल्या फोन क्रमांकावरून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला बदल फोन क्रमांक हजार इसमाच्या नावावर होता त्याची चौकशी केली असता त्यांनी हा नंबर कधीच घेतला नसल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असता, अंधेरी येथील एका मोबाईल सिम कार्ड कंपनीत काम करणाऱ्या राहुल कुमार दुबे याने हे सिमकार्ड विकले असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी राहुल दुबे याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता, त्याने कंपनीने दिलेले टार्गेट पुर्ण करण्याकरीता त्याचेकडे येणाऱ्या ग्राहकांची फसवणुक करून त्यांचे नावावर दोन ते तीन सिमकार्ड काढत असल्याचे सांगितले. त्यापैकी एक सिमकार्ड ग्राहकाला देवुन उरलेली सिमकार्ड त्याने भाईंदर येथे असलेल्या लोन रिकव्हरी टेली कॉल सेंटर सिटीझन कॅपीटलला दिले असल्याचे सांगितले.
पोलीस अधिकारी सुनील तारमळे यांच्या नेतृत्वात ठाणे खंडणी विरोधी पथकाने लोन रिकव्हरी टेली कॉल सेटर सिटीझन कॅपीटल, भांयदर येथे छापा टाकुन शुभम कालीचरण ओझा याने सदर सिमकार्ड हे लोन रिकव्हरी टेली कॉलीग करीता वापरलेले आहेत, व टेलीकॉलर अमित मंगला याना यांचे लोन रिकव्हरीकरीता अॅग्रीमेंट करून देण्यात आले आल्याची माहिती मिळाली. तपासून कोणतेही लोन/कर्ज घेतलेले नसतानाही त्यांना फोन केले व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांचेशी अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीनकडुन कॉम्पुटरमधील 4 एस.एस.डी.हार्डडिस्क, 1 जीएसएम गेटवे, 1 टीपी लिंक कंपनीचा 24 पोर्ट स्विच, 1 राऊटर, 3 मोबार्इल असा एकुण 77,300/- रूपये किमंतीचा माल हस्तगत केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि सुनिल तारमळे करीत आहे. यानंतर ठाणे पोलिसांनी अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेली कॉल सेंटर मधील इसम हे पुरूष व महीलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळी अथवा अश्लील भाषेत बोलुन त्रास देत असतील त्यांनी संबंधीत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असं आवाहन केलं आहे.