कल्याण : सध्या गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण (Ganpat Gaikwad Firing) चांगलच गाजतयं. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaiwad) यांनी एका वादातून शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि त्यांचे सहकारी राहूल पाटील (Rahul Patil) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना ११ दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
[read_also content=”उदगीरमधे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, एकाने तरुणाला मारला दगड; बॅनरही फाडले! https://www.navarashtra.com/latest-news/a-person-hit-stone-on-a-another-person-sitting-on-first-row-in-gautami-patil-program-in-ufgir-nrps-504478.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, अंबूरनाथ तालुक्यातील द्वारली येथे आमदार गणपत गायकवाड यांचा मधूमती एकनाथ जाधव यांच्यांसोबत ३१ जानेवारीला जागेवरुन वाद झाला. यावेळी गणपत गायकवाड यांच्यासह सात जणांनी मधूमती जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. ‘तुमची जमीन घेतल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही कोणत्याही कोर्टात जा’ असं म्हण्टलं होतं. अस आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे गणपत गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारीख, वि्ठठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकात ओल, मंगेश वारघेट यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, या वादातून आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख गहेश गायकवाड पोलिस ठाण्यात गेले होते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात चर्चा सुरु होती. या चर्चा सुरू असतानाच पोलीस ठाण्यातच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यासह त्यांचा साथीदार राहूल पाटील याच्यावर गोळ्या झाडल्या.