Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime: कुरुंदवाडमध्ये रिक्षात बेकायदा गॅस रिफिलिंग; गुन्हे अन्वेषण विभागाकडून ‘इतका’ मुद्देमाल जप्त

Kurundwad Crime: सुरक्षेसाठी लागणारी अग्निरोधक सामुग्री जवळ न ठेवता व घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून रिक्षामध्ये ८० रुपये किलो प्रमाणे बेकायदेशीर गॅस भरला जात असल्याचे आढळून आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 14, 2025 | 06:29 PM
Crime: कुरुंदवाडमध्ये रिक्षात बेकायदा गॅस रिफिलिंग; गुन्हे अन्वेषण विभागाकडून 'इतका' मुद्देमाल जप्त

Crime: कुरुंदवाडमध्ये रिक्षात बेकायदा गॅस रिफिलिंग; गुन्हे अन्वेषण विभागाकडून 'इतका' मुद्देमाल जप्त

Follow Us
Close
Follow Us:

कुरुंदवाड:  कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कुरुंदवाड येथील गोलंदाज मळा येथे घरगुती सिलिंडर गॅसमधून बेकायदेशीर रित्या रिक्षामध्ये गॅस भरून देण्याचे साहित्य सापडल्याने संशयित आरोपी तोहीद परवेज गोलंदाज (रा. दत्त कॉलेज रोड, गोलंदाज मळा, कुरुंदवाड) यास मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलीस हेड कॉन्स्टेबल अबूबकर अब्दुलगणी शेख यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली. त्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला.

येथील गोलंदाज मळा या ठिकाणी तोहीद गोलंदाज यांनी घरगुती सिलिंडर गॅसमधून बेकायदेशीररित्या रिक्षामध्ये गॅस भरून देत असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता संशयित आरोपी गोलंदाज यांच्या घरासमोरील शेड जवळ उघड्यावर पंधरा हजार रुपये किमतीचे पाच सीलबंद गॅस सिलिंडर, २५०० रुपये किंमतीची अर्धवट भरलेली गॅस सिलिंडर टाकी, तीन हजार पाचशे रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटर पाईप कॉक व इतर साहित्य, दोन हजार रुपये किमतीचा वजन काटा जप्त करण्यात आला.

तसेच पाचशे रुपये किमतीची पितळी नोझल, २५० रुपये किमतीची दोन पट्टी पाना असा एकूण २३ हजार ७५० रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. आर. कवळेकर, सहाय्यक फौजदार एच. डी. सवतेकर, सहाय्यक फौजदार पी. एस. नरके, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. एस. जरळी, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. डी. इंगवले ही कारवाई केली.

अग्निरोधक सामुग्रीचा अभाव

घरगुती वापराचे गॅस सिलिंडर धोकादायक पद्धतीने बाळगून स्फोटके माहित असतानाही सुरक्षेसाठी लागणारी अग्निरोधक सामुग्री जवळ न ठेवता व घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून रिक्षामध्ये ८० रुपये किलो प्रमाणे बेकायदेशीर गॅस भरला जात असल्याचे आढळून आल्याने जीवनावश्यक वस्तू कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Web Title: Auto rikshaw illegal gas filling crime branch arrest and seized many things crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 06:20 PM

Topics:  

  • Kurundwad

संबंधित बातम्या

कुरुंदवाड पोलिसांकडून अवैध धंद्यावर कारवाई सुरुच; एकाच दिवशी…
1

कुरुंदवाड पोलिसांकडून अवैध धंद्यावर कारवाई सुरुच; एकाच दिवशी…

‘नवराष्ट्र इम्पॅक्ट’! कुरुंदवाड पोलिसांची धडाडीची कारवाई; अवैध जुगार प्रकरणी पाच जणांवर थेट…
2

‘नवराष्ट्र इम्पॅक्ट’! कुरुंदवाड पोलिसांची धडाडीची कारवाई; अवैध जुगार प्रकरणी पाच जणांवर थेट…

Kolhapur News : कुरुंदवाडमध्ये अवैध धंद्यांवर मोठी कारवाई; 38 माव्याच्या पुड्या, दीड किलो सुपारीसह मुद्देमाल जप्त
3

Kolhapur News : कुरुंदवाडमध्ये अवैध धंद्यांवर मोठी कारवाई; 38 माव्याच्या पुड्या, दीड किलो सुपारीसह मुद्देमाल जप्त

Cylinder Blast: पुलाची शिरोलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; दोन महिला गंभीर जखमी
4

Cylinder Blast: पुलाची शिरोलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; दोन महिला गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.