Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोईसंदर्भात धक्कादायक खुलासा! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीचा आणखी एक व्हिडिओ समोर

Gangster Jishan Akhtar: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये गँगस्टर झीशानने लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोईबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 22, 2025 | 04:32 PM
लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोईसंदर्भात धक्कादायक खुलासा

लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोईसंदर्भात धक्कादायक खुलासा

Follow Us
Close
Follow Us:
  • आरोपी गँगस्टर झीशान अख्तरचा नवीन व्हिडिओ प्रसिद्ध
  • झीशान आता रोहित गोदरा टोळीत सामील
  • आरोपी गुंड झीशान अख्तरने या हाय-प्रोफाइल हत्येची जबाबदारी
Gangster Jishan Akhtar News In Marathi: मुंबईचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. अमेरिकेतून अनमोल बिश्नोईचे प्रत्यार्पण आणि अटक झाल्यानंतर काही दिवसांनीच बाबा सिद्दीकी यांचा मारेकरी झिशान अख्तर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. आरोपी गुंड झीशान अख्तरने या हाय-प्रोफाइल हत्येची जबाबदारी स्वीकारत आणखी एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओमध्ये झीशान स्पष्टपणे म्हणतो की, त्याने बाबा सिद्दीकींची हत्या केली आहे. हत्येनंतर तो परदेशात पळून गेला आणि आता रोहित गोदरा टोळीत सामील झाला आहे.

परदेशात लपून बसलेल्या झिशानने व्हिडिओमध्ये बिश्नोई बंधूंना “देशद्रोही” म्हटले आणि ते देशद्रोही घटकांशी संबंधित असल्याचे सांगितले. त्याने रोहित गोदरा टोळीत सामील झाल्याचीही पुष्टी केली. त्याने पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीशी भेट झाल्याचेही उघड केले. गुप्तचर संस्थांनी वृत्त दिले आहे की झिशान आता पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण

१२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील वांद्रे येथे माजी मंत्री बाबा सिद्दीकी (राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी एके-४७ रायफलमधून २० राउंड गोळीबार केला. ज्यामध्ये सिद्दीकी जागीच ठार झाले. मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या तपासात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचे उघड झाले. मुख्य शूटर शिवकुमार गौतम (अनमोल बिश्नोईचा जवळचा सहकारी) याला अटक करण्यात आली आहे. झिशान अख्तर (उर्फ मोहम्मद यासीन अख्तर, ३०, रहिवासी जालंधर) हा मुख्य कट रचणारा असल्याचे आढळून आले. झिशान घटनेनंतर भारतातून पळून गेला आणि पाकिस्तानमार्गे कॅनडाला पोहोचला. पोलिसांच्या आरोपपत्रात झिशान, अनमोल बिश्नोई आणि शुभम लोणकर यांना फरार घोषित करण्यात आले. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी अनमोल बिश्नोईचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आले आणि १९ नोव्हेंबर रोजी त्याला ११ दिवसांसाठी एनआयए कोठडीत पाठवण्यात आले.

झीशानची धक्कादायक कबुली

व्हिडिओमध्ये झीशान म्हणाला, “लॉरेन्स आणि अनमोलने मला बाबा सिद्दीकींची हत्या करण्याचे आदेश दिले होते. पण बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर ते मलाही मारण्याचा कट रचत होते. ते माझा गळा कापण्याचा कट रचत होते, पण मी पळून गेलो. ते देशद्रोही आहेत, देशाच्या शत्रूंशी हातमिळवणी करत आहेत.” झीशानने बिश्नोई बंधूंचे खलिस्तानी गटांशी संबंध असल्याचा दावा केला. अख्तरने रोहित गोदारा यांना त्याचा मोठा भाऊ म्हटले. त्याच व्हिडिओमध्ये त्याने धमकी दिली, “रोहित गोदारा आणि मी मिळून लॉरेन्स आणि अनमोलला संपवू.”

पाकिस्तान कनेक्शन

झीशानने पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीला भेटल्याचाही उल्लेख केला, ज्याने त्याला भारतातून पळून जाण्यास मदत केली. व्हिडिओमध्ये झीशान भावनिकपणे म्हणाला, “माझे स्वप्न आयपीएस अधिकारी बनण्याचे होते, परंतु परिस्थितीने मला गँगस्टर बनवले.” मुंबई पोलिस आणि एनआयएने व्हिडिओची चौकशी सुरू केली आहे. क्राइम ब्रांचच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ही कबुली तपासात एक नवीन वळण घेऊ शकते. झीशानचे स्थान शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, झीशानच्या जवळच्या मित्राने हा व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी केली.

Web Title: Baba siddique murder accused jishan akhtar latest viral video told he will kill after order lawrence and anmol bisnoi news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • Anmol bishnoi
  • baba Siddique
  • Lawrence Bishnoi

संबंधित बातम्या

Anmol Bishnoi News: कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला दणका; कोर्टाने सुनावली 11 दिवसांची कोठडी, आता NIA…
1

Anmol Bishnoi News: कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला दणका; कोर्टाने सुनावली 11 दिवसांची कोठडी, आता NIA…

Anmol Bishnoi News : कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणले, NIA कडून दिल्ली विमानतळावर अटक
2

Anmol Bishnoi News : कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणले, NIA कडून दिल्ली विमानतळावर अटक

Anmol Bishnoi Arrest : गँगस्टर अनमोल बिश्नोई लवकरच दिल्लीत; NIA ने आवळल्या मुसक्या
3

Anmol Bishnoi Arrest : गँगस्टर अनमोल बिश्नोई लवकरच दिल्लीत; NIA ने आवळल्या मुसक्या

सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती; मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण
4

सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती; मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.