Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुगलवरून नंबर शोधताय तर थांबा; पडू शकतं महागात, बोगस वेबसाईट्स होताहेत तयार

राज्यात सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर गुन्हेगार नवीन क्लृप्त्यांचा वापर खात्यातून पैसे परस्पर उकळण्यासाठी करत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 27, 2024 | 03:04 PM
गुगलवरून संपर्क करणे पडेल महागात

गुगलवरून संपर्क करणे पडेल महागात

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : एखादे खासगी प्रतिष्ठान, शासकीय कार्यालय किंवा कंपनीचा संपर्क क्रमांक इंटरनेटवरून शोधत असाल तर तुम्ही नक्कीच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण, सायबर गुन्हेगारांनी आता अनेक कंपन्यांचे बनावट संकेतस्थळ तयार करणे सुरू केले आहे. त्यावरील क्रमांकावर संपर्क करणाऱ्या ग्राहकांना सायबर गुन्हेगार जाळ्यात ओढून फसवणूक करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

हेदेखील वाचा : कोणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? पुण्यातील ‘या’ आमदारांची नावे अधिक चर्चेत, उत्सुकता वाढली

राज्यात सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर गुन्हेगार नवीन क्लृप्त्यांचा वापर खात्यातून पैसे परस्पर उकळण्यासाठी करत आहे. सध्या सायबर गुन्हेगारांनी रेल्वेस्थानक, बसस्थानक, विमानतळासह शासकीय कार्यालये तसेच खासगी सेवा देणाऱ्या कंपन्यांची बनावट संकेतस्थळे तयार केली आहे. त्या बनावट संकेतस्थळाची रचना मूळ कंपन्यांसारखी असते. त्यामुळे गुगलचा वापर करून संपर्क क्रमांक शोधणाऱ्या अनेक ग्राहकांना सायबर गुन्हेगार जाळ्यात ओढतात.

ग्राहकांना काही मिनिटातच खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज मोबाईलवर मिळतो. ग्राहक गोंधळलेल्या अवस्थेत असतो. परंतु, पोलिसांपर्यंत तक्रार देईपर्यंत सायबर गुन्हेगाराने ग्राहकाचे खाते रिकामे केलेले असते. त्यामुळे गुगलवरून ग्राहक प्रतिनिधींचे किंवा इतर संपर्क क्रमांक शोधताना काळजी घेणे आवश्यक आहे.

गुगलवरुन टॅक्सी बुकिंग भोवले

इंटरनेटवरून शोधलेल्या ग्राहक प्रतिनिधींशी संपर्क साधल्यास तो क्रमांक सायबर गुन्हेगाराचा असू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी बनावट संकेतस्थळापासून सावध राहावे. ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करावी.

सायबर गुन्हेगारांकडून अशी होते फसवणूक…

एटीएम कार्ड-क्रेडिट कार्डची माहिती ऑनलाईन टाकण्यास सांगितले जाते. ग्राहकाने टॅक्सी बुक करण्यासाठी गुगलवरुन संपर्क क्रमांक शोधल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी एका युवकाची एक लाख रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी पीडित अमोल भोलानाथ चौरे याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. अमोलने गुगलवर टॅक्सी कंपन्यांचे नंबर शोधले. या दरम्यान त्यांना शिवशक्ती कार रेंट्स ही वेबसाईट दिसली. त्यांनी वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि मोबाईल नंबर नोंदविला. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी शिवशक्ती कार रेंट्सच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करुन युवकाच्या खात्यातून एक लाख रुपये परस्पर काढले.

अशी घेण्यात यावी खबरदारी…

ग्राहक, प्रतिनिधी किंवा इतर क्रमांक हवा असल्यास अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. संपर्क क्रमांक किंवा ग्राहक प्रतिनिधींचा दूरध्वनी क्रमांक पडताळून घ्यावा. सेवा किंवा वस्तू मिळवण्यासाठी ऑनलाईन पैसे भरू नये. एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्डची माहिती देऊ नये. अन्यथा सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता असते.

Web Title: Be careful while search number on google nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 03:04 PM

Topics:  

  • Google Search
  • Nagpur News

संबंधित बातम्या

अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती होताच..
1

अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती होताच..

मैत्रिणींसाठी ‘तो’ बनला चोर; एक-दोन नाहीतर तब्बल 9 ठिकाणी घरफोडी, दुचाकीवर फिरला अन्…
2

मैत्रिणींसाठी ‘तो’ बनला चोर; एक-दोन नाहीतर तब्बल 9 ठिकाणी घरफोडी, दुचाकीवर फिरला अन्…

Nagpur News : इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये धडक कारवाई, गांजासह युवक गजाआड, 2.19 लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Nagpur News : इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये धडक कारवाई, गांजासह युवक गजाआड, 2.19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagpur News : हर्षवर्धन सपकाळ मोदींवर बोलण्याआधी आपली उंची तपासावी – बावनकुळे
4

Nagpur News : हर्षवर्धन सपकाळ मोदींवर बोलण्याआधी आपली उंची तपासावी – बावनकुळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.