Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इतवारीतील धार्मिक वास्तूबाबत न्यायालय कठोर; मनपाला फटकार, ८ आठवड्यांत निर्णयाचे निर्देश

नागपूर येथील सेंट्रल अव्हेन्यूवरील कथित बेकायदेशीर धार्मिक वास्तू प्रकरणात उच्च न्यायालयाने मनपाला फटकारत स्थलांतराबाबत आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले. पाच वर्षांपासून कारवाई न झाल्याचा मुद्दा सोसायटीने मांडला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 16, 2026 | 03:50 PM
nagpur (फोटो सौजन्य: social media)

nagpur (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सेंट्रल अव्हेन्यूवरील प्लॉट क्रमांक ५८ वरील धार्मिक अतिक्रमणाचा वाद.
  • न्यायालयाने मनपाला एका आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश.
  • निर्णयापूर्वी ट्रस्ट व याचिकाकर्त्यांना सुनावणीची संधी देण्याचे आदेश.
नागपूर: नागपूर जनरल मर्चेंट को-हाऊसिंग सोसायटी लिमिटेडने शहरातील सेंट्रल अव्हेन्यू परिसरातील प्लॉट क्रमांक ५८ वरील बेकायदेशीर धार्मिक वास्तू आणि अतिक्रमण हटविण्यात उच्च न्यायालयाने मनपाला फटकारले आहे. यासंदर्भात न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांनी इतवारी परिसरातील धार्मिक वास्तू पूर्णपणे स्थलांतरित करण्याच्या प्रलंबित अर्जावर आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश महापालिकेला दिले. अॅड. गिरीश दीपवानी यांनी याचिकाकत्यांची बाजू मांडली.

Nagpur Crime: तब्बल १.९४ कोटींचा गंडा; केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याची बतावणी

८न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, निर्णय घेण्यापूर्वी ट्रस्टला नोटीस बजावावी आणि याचिकाकर्त्याला व ट्रस्टला भूमिका मांडण्यासाठी संधी द्यावी. प्रशासनाने निर्णयाच्या दोन आठवड्यांच्या आत संबंधित पक्षांना निर्णयाची माहिती द्यावी. याचिकाकत्यां सोसायटीच्या म्हणण्यानुसार, सेंट्रल अव्हेन्यूवरील या भूखंडावर

त्यांच्याकडे २०५० पर्यंत वैध भाडेपट्टा आहे. हजरत बाबा सय्यद मुराद अलीशाह ट्रस्टने तेथे बेकायदेशीरपणे धार्मिक वास्तू उभारल्याचा आरोप आहे. याचिकेत म्हटले आहे, उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर २०१९ रोजी ट्रस्टची याचिका फेटाळून लावली आणि त्यांना स्थलांतरित होण्यासाठी फक्त दोन आठवड्यांचा कालावधी दिला. तरीही मनपाने अद्याप ही वास्तू पूर्णपणे काढून टाकण्यासाठी किंवा मलबा साफ करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही.

पाच वर्षे उलटूनही कोणतीही कारवाई नाही
अॅड. गिरीश दीपवानी युक्तिवादात म्हणाले, सोसायटीने ४ जानेवारी २०२१ रोजी मनपाला निवेदन सादर करून धार्मिक वास्तू स्थलांतरित करण्याची विनंती केली होती. पाच वर्षे उलटूनही मनपाने कोणतीही कारवाई केली नाही. पूर्वीच्या निर्णयाचा दाखला देत त्यांनी सांगितले, हा खटला ७ ऑक्टोबर २०१९ रोजी रिट याचिका क्रमांक ८६८७/२०१८ (हजरत बाचा सय्यद मुराद अलीशाह ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर) मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आधारित आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सोसायटीने प्रशासनाकडे संरचना स्थलांतरित करण्यासाठी अपील केले.

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा वाद कशाबाबत आहे?

    Ans: सेंट्रल अव्हेन्यूवरील प्लॉटवरील कथित बेकायदेशीर धार्मिक वास्तू हटविण्याबाबत.

  • Que: न्यायालयाने काय आदेश दिले?

    Ans: मनपाने एका आठवड्यात निर्णय घ्यावा आणि संबंधित पक्षांना सुनावणीची संधी द्यावी.

  • Que: सोसायटीचा मुख्य दावा काय आहे?

    Ans: सोसायटीचा मुख्य दावा काय आहे?

Web Title: Court strict on religious structure in itwari reprimands municipal corporation directs decision within 8 weeks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • High court
  • Nagpur
  • Nagpur News

संबंधित बातम्या

जून महिन्याची ‘थकबाकी’ भरून काढतोय जुलैचा पाऊस; केवळ एका दिवसातच 152.5 मिमी पावसाची नोंद
1

जून महिन्याची ‘थकबाकी’ भरून काढतोय जुलैचा पाऊस; केवळ एका दिवसातच 152.5 मिमी पावसाची नोंद

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
2

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Nagpur Crime: लुटमारीला विरोध महागात! ऑटोचालकावर सपासप वार; जागीच मृत्यू, नागपुरात खळबळ
3

Nagpur Crime: लुटमारीला विरोध महागात! ऑटोचालकावर सपासप वार; जागीच मृत्यू, नागपुरात खळबळ

Sonam Wangchuk  :  सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवरून नवा वाद; पत्नीने थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले
4

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवरून नवा वाद; पत्नीने थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.