Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed News: जनावरे चोरली, ट्रकमध्ये कोंबली अन् हरियाणाच्या दिशेने पलायन; बीडमध्ये पर्दाफाश

गोठ्यातून गायी-बैल गायब झाले आणि काही वेळातच चोरीची जनावरे ट्रकमधून हरियाणाच्या दिशेने निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला अन् कापशी फाट्याजवळ अंधारात पळून जाणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 06, 2026 | 12:14 PM
Beed News: जनावरे चोरली, ट्रकमध्ये कोंबली अन् हरियाणाच्या दिशेने पलायन; बीडमध्ये पर्दाफाश

Beed News: जनावरे चोरली, ट्रकमध्ये कोंबली अन् हरियाणाच्या दिशेने पलायन; बीडमध्ये पर्दाफाश

Follow Us
Follow Us:
  • चोरीची जनावरे ट्रकमधून हरियाणाकडे
  • कापशी फाट्याजवळ पोलिसांनी घेतले ताब्यात
  • हरियाणातील दोघे ट्रक आणि चोरीची जनावरेंसह अटक
बीड: गोठ्यात बांधलेली जनावरे रातोरात गायब झाली आणि त्याच जनावरांना ट्रकमधून हरियाणाच्या दिशेने नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता ट्रकचा पाठलाग केला आणि कापशी फाट्याजवळ संशयितांना पकडून जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.

चोरीची जनावरे ट्रकमध्ये

कडा येथील गोपीनाथ काकडे यांच्या शेतातील गोठ्यातून तीन गायी चोरीला गेल्या होत्या. तसेच सांगवी पाटण येथील अशोक खिल्लारे यांची एक गाय आणि दत्तात्रय भोसले यांचा एक बैल चोरीला गेला होता. या घटनांचा तपास सुरू असतानाच चोरीची जनावरे एका खासगी ट्रकमधून हरियाणाच्या दिशेने नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांचा थरारक पाठलाग

माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ट्रकचा शोध सुरू केला. काही अंतरावर ट्रक दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पोलिस पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवला. अखेर कापशी फाट्याजवळ ट्रक थांबला. यावेळी संशयितांनी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी परिसरात शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले.

हेही वाचा: Scam News: चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून विश्वास जिंकला अन् 22 लाखांना गंडा घातला

हरियाणातील दोघे अटकेत

पोलिसांनी ताविद रोशन पठाण (वय ३८, रा. अडबार, जिल्हा नूह, हरियाणा) आणि अमजद सिखार खान (वय १९, रा. रामलगड, ता. पुन्हाना, जिल्हा नूह, हरियाणा) यांना अटक केली. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये चोरीची जनावरे आढळून आली. ट्रकसह जनावरेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

जनावरांना औषध लावल्याचा दावा

पोलिसांच्या चौकशीत चोरी केलेली जनावरे ट्रकमध्ये कोंबून नेली जात असल्याचे समोर आले. तसेच जनावरांना शांत ठेवण्यासाठी त्यांच्या तोंडाला औषध लावल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा: Gondiya News: गोंदियात दोन दुर्घटना, दोन बळी; तलावात मुलाचा तर मूर्ती विसर्जनावेळी जवानाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

टोळीत आणखी किती जण?

या कारवाईत पोलिस हवालदार भाऊसाहेब आहेर, प्रभाकर खोले, अमोल नवले आणि चालक प्रताप घोडके यांनी सहभाग घेतला. या टोळीमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, तसेच यापूर्वी परिसरातून चोरीला गेलेल्या जनावरांशी या संशयितांचा संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पशुपालकांनी दक्ष राहावे

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी रात्रीच्या वेळी गोठ्यांमध्ये विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोठ्याजवळ अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद वाहन आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Beed news livestock stolen crammed into a truck and hauled towards haryana racket busted in beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 12:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.