मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी (Capital) भोपाळमधील (Bhopal) लोकायुक्त (Lokayukta) पोलिसांनी गुरुवारी पहाटे पोलीस गृहनिर्माण महामंडळाची प्रभारी सहाय्यक अभियंता (कंत्राटी), हेमा मीनाच्या (Hema Meena) भोपाळ, रायसेन, विदिशा या ठिकाणांवर छापे (Raid) टाकले. यादरम्यान, सुरुवातीच्या टप्प्यात अभियंता हेमा मीना (Engineer Hema Meena) यांची सुमारे सात कोटींची मालमत्ता (7 Crore Property) उघडकीस आली आहे. आता लोकायुक्तांची कारवाई होणार आहे.
लोकायुक्त टीमचे नेतृत्व करत असलेले डीएसपी संजय शुक्ला यांनी सांगितले की, हेमा मीना हाऊसिंग कॉर्पोरेशन, भोपाळच्या प्रभारी सहाय्यक अभियंता (कंत्राटी) म्हणून कार्यरत आहेत. 2020 मध्ये हेमा मीना यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेची तक्रार प्राप्त झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
[read_also content=”अज्ञात कारणावरून तरुणाने केले विष प्राशन, बैतुलला नेत असताना वाटेतच… https://www.navarashtra.com/crime/suicide-crime-due-to-unknown-reasons-the-youth-consumed-poison-and-died-on-the-way-while-being-taken-to-baitul-nrvb-397811.html”]
विशेष पोलीस आस्थापना भोपाळ विभाग (लोकायुक्त) भोपाळ यांनी या प्रकरणाचा तपास केला असता, हेमा मीना यांनी भोपाळमधील बिलखिरिया गावात 20 हजार चौरस फूट जमीन आपल्या वडिलांच्या नावाने खरेदी केली होती आणि सुमारे एक कोटी रुपये खर्च करून त्यावर इमारत बांधून पूर्ण झाल्याचे आढळून आले. याशिवाय भोपाळ, रायसेन, विदिशा येथील विविध गावांमध्ये शेतजमीन इ. खरेदी केली.
यासोबतच हेमा मीना यांनी हार्वेस्टर, भात पेरणी यंत्र, ट्रॅक्टर आणि इतर शेती उपकरणे खरेदी केली. लोकायुक्तांचे म्हणणे आहे की, सध्या हेमा मीना यांचे मासिक वेतन सुमारे 30 हजार रुपये आहे. हेमा मीना यांनी खरेदी केलेल्या मालमत्ता त्यांच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा 232 टक्क्यांनी जास्त आहेत. याबाबत हेमा मीना यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 11 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-11-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
या प्रकरणी भोपाळ येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा विशेष न्यायालयाकडून सर्च वॉरंट मिळाल्यानंतर लोकायुक्त पथकाने बिलखिरिया येथील निवासस्थानासह तीन ठिकाणी कारवाई सुरू केली, ती अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत सुमारे 5 ते 7 कोटींची मालमत्ता उघडकीस आली आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर एकूण मालमत्तेचे मूल्यांकन केले जाईल.