केंदूरमध्ये जमिनीच्या वादातून बहिणींसह वडिलांना मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल
एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या घोषणा होत असताना, दुसरीकडे एका महिलेनेच आपल्या नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करत अमानुषतेची सीमा गाठली आहे. उल्हासनगरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, आरोपी महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलीस होणार आता आणखी स्मार्ट,सायबर गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणार
नऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्यंत क्रूरपणे चाकू व लाटणीने हल्ला करणाऱ्या एका महिलेविरोधात उल्हासनगर पोलिसांनी कठोर कारवाई करत तिला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिला बांगलादेशची रहिवासी असून ती उल्हासनगरमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास होती. अमिना सुलतान ऊर्फ पूजा (३५) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या राहत्या घरी तिने आपल्या नऊ वर्षांच्या मुलीवर प्रचंड संतापात हल्ला चढवला. चिमुकलीच्या चेहऱ्यावर आणि पायावर चाकूने वार करण्यात आले, तसेच घरगुती लाटणीचा वापर करून तिला बेदम मारहाण करण्यात आली.
आरोपी महिलेला अटक
घरातून मुलीच्या ओरडण्याचा आवाज शेजाऱ्यांना ऐकू आल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला अटक केली. मुलीवर त्वरित वैद्यकीय करण्यात आले असून, सध्या ती सुरक्षित असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे. प्राथमिक चौकशीतून ही महिला बांगलादेशची रहिवासी असल्याचे उघडकीस आले आहे.
आरोपीला सुनावली पोलिस कोठडी
आरोपी महिलेला उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, तिच्या भारतात येण्यामागील मार्ग व इतर संबंधित व्यक्तींचाही तपास केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच आमचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि संबंधित महिलेला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात तिचं वर्तन अत्यंत आक्रमक आणि अस्वस्थ करणारे होते. तिच्या विरोधात भारतीय दंड संहितेनुसार संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून, तिचं नागरिकत्व बांग्लादेशचं असल्याचं निष्पन्न झाले आहे. परकीय नागरिक कायद्यांतर्गतही तपास सुरू आहे. – शंकर अवताडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक