CM (फोटो सौजन्य- PINTEREST)
मुंबई, सायबर गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी सायबर गुन्ह्यांमधील तपासात सायबर प्रयोगशाळा महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी शासन प्रयोगशाळा निर्माण करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर प्रयोगशाळांचे जाळे अधिकाधिक सक्षम करण्याच्या सुचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या सोमवारी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या विविध उपक्रमांचे लोकार्पण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमामध्ये सायबर गुन्ह्यांवर त्वरित कारवाईसाठी ‘राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक १९३०’ संदर्भातील चित्रफित तयार करणारे निर्माते साहिल कृष्णानी आणि मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नुतनीकृत ‘उत्कर्ष’ सभागृहाच्या सौंदर्याकरणासाठी मोलाचे योगदान देणारे अता ऊर शेख यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. मुंबई पोलिसांना १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत पोलिस यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. मुंबई पोलिसांना १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत पोलिस ठाण्यांमध्ये नागरिककेंद्री सुविधा तयार करणे, पोलिस ठाण्यांमध्ये स्वच्छता राखणे अशी उद्दिष्टे पूर्तता केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांचे अभिनंदन केले.
पोलिसांवर वाढतोय ताण; एक लाख लोकसंख्येसाठी केवळ 172 कर्मचारी
अत्याधुनिक प्रयोगशाळा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सायबर सुरक्षिततेसंदर्भात ३ लॅब सुरू करण्यात आल्या असून त्यात अत्यंत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशा गुन्ह्यांवर तात्काळ आणि प्रभावी कारवाई करणे अत्यावश्यक आहे. यासाठी आपल्याकडे सर्वोत्तम आणि आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण लॅब असणे अत्यंत गरजेचे आहे. आपण महासायबर हेडक्वार्टर तयार केले आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘राष्ट्रीय स्तरावर १९३०’ आणि ‘राज्य स्तरावर १९४५’ असे दोन हेल्पलाईन नंबर आहेत. यामध्ये समन्वय साधून सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एकच हेल्पलाईन नंबर वापरता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
न्याय व्यवस्थेला गती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ३ नवीन फौजदारी कायद्यांमुळे फौजदारी न्यायव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. फोर्सेस आणि फौजदारी न्यायव्यवस्थेचे १०० टक्के भारतीयीकरण करण्याचा प्रयत्न या नव्या कायद्यांद्वारे करण्यात येत आहे. या कायद्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे तंत्रज्ञानाच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणावर मुभा देण्यात आली आहे.
पोलिस दलातील सायबर अत्याधुनिकता
मुंबई, मुंबईसह देशभरात गेल्या वर्षभरात सायबर गुन्ह्यांत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाच्या आधुनिकतेसाठी सरकारी पाऊले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदान येथील पोलीस सभागृहात तसेच दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाणे येथे ‘निर्भया सायबर लॅब’चेही उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘निर्भया सायबर लॅब’मधील स्टाफ रूम, कॉन्फरन्स रूम आणि ऑफिसर रूमची पाहणी केली.