मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वांद्रे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीविरुद्ध ठोस आणि महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. तब्बल एक हजार पानांच्या या आरोपपत्रात फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाचा उल्लेख करण्यात आला असून, त्यात सैफ अली खानच्या शरीरातून सापडलेला चाकूचा तुकडा आणि आरोपींकडून जप्त करण्यात आलेला चाकू याचे तुकडे एकाच शस्त्राचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, घटनास्थळी सापडलेले बोटांचे ठसेही आरोप सिद्ध करणारे ठरले आहेत.
जानेवारी 2025 मध्ये सैफ अलीखानच्या घडली होती. शरीफुल इस्लाम नावाच्या व्यक्तीने सैफ अली खानच्या घरात घुसण्याचा आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान सैफने हस्तक्षेप केल्यावर आरोपीने त्याच्यावर हल्ला चढवला आणि गंभीर जखमी केले. या हल्ल्यात सैफ अली खानच्या शरीरावर अनेक चाकूचे घाव करण्यात आले होते. त्यामुळे त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली आणि त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पाठीच्या कण्याजवळ अडकलेला चाकूचा तुकडा शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला आणि उपचारानंतर दोन-तीन दिवसांत त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
पुणे महापालिका ‘ॲक्शन मोड’वर; पावसाळ्यापूर्वी काढली जाणार 180 ठिकाणची अतिक्रमणे
तसेच, आरोपीकडून सापडलेले चाकूचे तुकडे आणि सैफच्या शरीरातून मिळालेले तुकडे एकाच चाकूचे भाग आहेत. याशिवाय, डाव्या हाताच्या बोटांचे ठसे हेही तपासात महत्त्वाचे ठरले असून, त्यांचाही आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे.
सैफ अली खान सध्या चर्चेत का?
सैफ अली खान सध्या दोन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे, जानेवारी २०२५ मध्ये त्याच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले आहे. तर दुसरीकडे, तो एका १३ वर्षे जुन्या प्रकरणामुळेही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०१३ मध्ये एका हॉटेलमध्ये झालेल्या भांडणाशी संबंधित या प्रकरणाची सुनावणी नुकतीच सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी सैफ अली खान न्यायालयात हजर झाला होता. या प्रकरणात अमृता अरोरा यांनी त्याच्या वतीने साक्ष दिली आहे, तर मलायका अरोरा साक्ष देण्यासाठी न्यायालयात उपस्थित राहू शकली नाही. त्यामुळे न्यायालयाने तिच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
दरम्यान, 2012 सालीदेखील बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील ताज हॉटेलमधील वासाबी रेस्टॉरंटमध्ये दक्षिण आफ्रिकास्थित एनआरआय व्यापारी इक्बाल शर्मा आणि त्यांच्या सासऱ्यांशी झालेल्या वादानंतर हल्ल्याचा आरोप लावण्यात आला होता. शर्मा यांनी सैफ आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या मोठ्या आवाजामुळे त्रस्त होऊन व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. या वादानंतर, सैफ यांनी शर्मांना मारहाण केली, ज्यामुळे त्यांच्या नाकाला फ्रॅक्चर झाले. या घटनेनंतर, सैफ अली खान यांना अटक करण्यात आली आणि नंतर जामिनावर मुक्त करण्यात आले.
हेही पाहा-