Akshay Shinde Encounter: '... त्यामुळे आम्हाला केस लढवायची नाही'; अक्षयच्या पालकांची भूमिका, कोर्टात काय घडलं?
मुंबई: बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुपूर्द केली आहेत. गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विशेष तपास पथक प्रथम सर्व कागदपत्रांचा सखोल अभ्यास करेल. या अभ्यासाच्या आधारेच पुढील तपासाची दिशा आणि कारवाई ठरवली जाणार आहे.
उच्च न्यायालयाची फटकार आणि त्वरीत हालचाल
गेल्या शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वाचा आदेश दिला होता. अक्षय शिंदेच्या कोठडीतील मृत्यूनंतरही पाच पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला न गेल्याने न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना कडक शब्दांत फटकारले होते. न्यायालयाच्या या हस्तक्षेपानंतर अवघ्या काही तासांतच गुन्हे शाखेकडे कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली.
‘जय महाकाली,अयो गोरखाली…’ दुश्मनांचाही थरकाप उडवणारी भारतीय रेजिमेंटची घोषवाक्ये, एकदा वाचाच
सीआयडीला न्यायालयाचे स्पष्ट आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले होते की, गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली एक स्वतंत्र विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे. या पथकात गौतम यांच्या पसंतीचे अधिकारी असतील आणि त्याचे नेतृत्व पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) दोन दिवसांत प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे लखमी गौतम यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले होते.
शुक्रवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने,’ न्यायालयाच्या आदेशाचे वेळेवर पालन झालेले नाही. त्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तातडीने हालचाली करत सीआयडीने संबंधित कागदपत्रे गुन्हे शाखेकडे सुपूर्द केली आहेत.’ असे निरीक्षण मांडले.
आगामी तपासावर लक्ष
आता संपूर्ण प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेच्या नव्याने स्थापन झालेल्या विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आली आहे. तपास पथक शिंदेच्या मृत्यूच्या परिस्थितीचा सखोल छडा लावणार आहे. पुढील तपासातील निष्कर्षांवरच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरोधातील कारवाई ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Lahore Airport Fire: पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर भीषण आग, सर्व उड्डाणे रद्द
बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेचा मृत्यू पोलिसांच्या कथित चकमकीत झाला होता. आता या प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुपूर्द केली असून, विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
चकमकीतील मृत्यूची घटना
२३ सप्टेंबर २०२४ रोजी, शिंदेला तळोजा कारागृहातून कल्याण न्यायालयात नेले जात असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दावा केला की शिंदेने त्यांच्या पथकावर गोळीबार केला, ज्याच्या प्रत्युत्तरात झालेल्या कारवाईत त्याचा मृत्यू झाला. मात्र, या चकमकीवर त्वरित प्रश्न उपस्थित झाले आणि गंभीर चौकशीची मागणी होऊ लागली.
दंडाधिकाऱ्यांचा अहवाल: बनावट चकमकीची पुष्टी
या घटनेची चौकशी दंडाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. त्यांच्या अहवालात मोठा खुलासा झाला आहे — त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की शिंदेच्या मृत्यूच्या बाबतीत पोलिसांनी बनावट चकमक घडवून आणली होती. अहवालात पाच पोलिस अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. दोषी ठरवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
संजय शिंदे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणे गुन्हे शाखा)
नीलेश मोरे (सहाय्यक पोलिस निरीक्षक)
अभिजीत मोरे (हेड कॉन्स्टेबल)
हरीश तावडे (हेड कॉन्स्टेबल)
सतीश खताळ (पोलीस वाहन चालक)