Lahore Airport Fire: पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर भीषण आग, सर्व उड्डाणे रद्द ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Lahore Airport Fire: पाकिस्तानातील लाहोर येथील विमानतळावर भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून, या आगीमुळे सर्व उड्डाणे तातडीने रद्द करण्यात आली आहेत. सध्या अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या आगीने विमानतळावरील कामकाज ठप्प झाले असून प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
पाकिस्तानातील लाहोर येथील विमानतळावर आग लागल्याची बातमी समोर आली आहे. या आगीमुळे सर्व उड्डाणे तात्काळ रद्द करण्यात आली असून, प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराचे एक विमान लाहोर विमानतळावर उतरत असताना त्याच्या टायरला अचानक आग लागली.
या घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. सुरक्षेच्या दृष्टीने धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली असून, पाकिस्तानी सैन्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. सध्या घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
Lahore airport burning!!
Ye to bas shuruwat hai, Karma will hit Pak so badly that it will be begging for mercy very soon.pic.twitter.com/RNg8bR2GK4
— Aakash Verma ಆಕಾಶ್ ವರ್ಮ 🇮🇳 (@vermaaakash10) April 26, 2025
लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आगीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विमानतळ परिसरात उपस्थित असलेले लोक धुरामुळे कसे त्रस्त झाले आहेत, हे स्पष्टपणे दिसून येते. ३२ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये काही प्रवासी या घटनेबद्दल आपली मते व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये काळ्या धुराचे मोठाले ढग सतत वर येताना दिसत आहेत, ज्यामुळे परिसरात दाट धुराचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असून, सुदैवाने अद्याप कोणत्याही जिवीत वा वित्तहानीचे वृत्त प्राप्त झालेले नाही.
credit : social media
.
.
.
. बातमी अपडेट होत आहे…