Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नंदुरबारमध्ये ईदच्या जूलुसवेळी तुंबळ हाणामारी; दंगल परिस्थितीवर पोलिसांची करडी नजर  

मुहम्मद पैगंबर यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली. मात्र ईदच्या जुलूसवेळी नंदुरबारमध्ये दोन गटामध्ये वाद निर्माण झाला. आणि तुंबळ हाणामारी झाली. याचे व्हिडिओ आणि फोटो देखील काढण्यात आले. दंगल सदृश्य परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये नंदुरबार पोलिसांना यश आले आहे. मात्र अफवा पसरवण्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 20, 2024 | 11:15 AM
Nandurbar Police

Nandurbar Police

Follow Us
Close
Follow Us:

नंदुरबार : राज्यभरामध्ये पैगंबर जयंती मुस्लीम बांधवांकडून उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. मात्र नंदूरबारमध्ये ईदला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. ईदच्या जूलुस दरम्यान दोन गटात तुंबऴ हाणामारी झाली. यामुळे दंगल परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेमुळे नंदुरबारमध्ये तणाव आणि भीतीचे वातावरण  निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली असून परिसरावर लक्ष ठेवण्यात आले आहे.

पैगंबर जयंतीनिमित्त आज नंदुरबार शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. या दरम्यान दोन गटात वाद निर्माण झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला. काही भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोटरसायकलींची नासधूस करण्यात आली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तणाव मिटला. आता नंदुरबार शहरात तणावपूर्ण शांतता असून मोठ्या संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तान तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही अफवा पसरवू नये अफवा पसरवण्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिले आहेत.

नंदुरबार शहरात ईदच्या जूलुस दरम्यान दोन गटात दंगल झाली. या परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आढावा घेतला आहे. रात्री उशिरा नंदुरबारमध्ये दाखल होत त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली आहे. तसेच त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेत या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच या दंगलीच्या अनुषंगाने काही व्हिडिओ किंवा फोटो जर नागरिकांकडे असेल तर त्यांनी ते पोलीस दलाला देण्याचे आवाहन त्यांनी केले. हे व्हिडिओ व फोटो पोलिसांना देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस असा मोठा फौज फाटा होता. विशेष म्हणजे आज एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने ईदच्या जुलूसा दरम्यान दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील घटनांमध्ये काही कनेक्शन आहेत का याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना विचारणा केली असता त्याबाबत आम्ही तपास करू असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

 

Web Title: Clashes during eid procession in nandurbar cops are monitoring the whole situation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 11:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.