लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य
कुही : शहरातील डेपो परिसरात बोर्डाच्या दहावी इंग्रजीच्या पेपरला जात असलेल्या विद्यार्थ्याने पेपरच्या भीतीने विषारी द्रव्य प्राशन केले. त्याला उपचारासाठी नागपुरातील रुग्णालायात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. या घटनेने कुहीत हळहळ व्यक्त होत असून पालकांवर आभाळ कोसळले.
आर्यन विजय लुटे (वय 17, रा. आकोली, ता. कुही) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कुही शहरातील एका विद्यालयाचा विद्यार्थी होता. गेल्यावर्षी मार्च 24 मधील शालांत परीक्षेत तो नापास झाला. शासनाच्या नियमानुसार एटीकेटी घेऊन त्याने इयत्ता अकरावीत प्रवेश घेतला होता. तो सप्टेंबर महिन्यातील पूरक परीक्षेस बसला होता. परंतु, पेपरच्या दिवशी पूर आल्याने उमरेड येथे परीक्षेस जाऊ शकला नाही. त्यामुळे तो निराश झाला.
त्यातच त्याचा दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. पुन्हा नापास होण्याच्या भीतीने त्याने शहरातील डेपो परिसरात विषारी द्रव्य प्राशन केले. परिसरातील नागरिकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच त्याचे वडील विजय लुटे व आकोलीचे माजी सरपंच गजानन धांडे हे कुही येथे आले. तिथे डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता नागपूर मेडिकलमध्ये रवाना केले. नागपूर मेडिकल इस्पितळात पोहोचताच त्याचा मृत्यू झाला.
अमरावतीतही विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
कमी गुण मिळाल्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने हाताची नस कापून थेट इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना उघडकीस आली असून, मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमरावती शहरातील फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित महाविद्यालयात बीएचएमएसच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने हा प्रयत्न केला.
बारावीच्या विद्यार्थ्याचीही आत्महत्या
सांगली जिल्ह्यातील मिरजेत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. प्रथमेश बिराजदार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रथमेश हा शहरातील भारतनगर येथे पालकांसमवेत राहत होता. तो मिरजेतील एका खासगी अकॅडमीत बारावीचे शिक्षण घेत होता. मंगळवारपासून बारावीचे पेपर दरम्यान, यापूर्वी सोमवारी सायंकाळी संबंधित अकॅडमीमध्ये बारावीचा पेपर कसा सोडवायचा, याबाबत माहिती देण्यात आली होती. अकॅडमीमधून प्रथमेश हा रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी परतला. त्यानंतर तो अभ्यासासाठी घराच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या खोलीत गेला. नंतर त्याने खोलीतील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.