crime income tax raids 10 crore it evasion revealed in bihar 1 crore 83 lakh cash seized from sahu mishthan muzaffarpur
पाटणा : बिहारमध्ये (Bihar) आयकर विभागाकडून (Income Tax Department) आयकर चोरी (Income Tax Evasion) करणाऱ्यांविरोधात सातत्याने कडक कारवाई करण्यात येत आहे. दरभंगा (Darbhanga) येथील डॉक्टर दाम्पत्य आणि मुझफ्फरपूरच्या मोतीपूरमधील साहू मिष्टान यांच्या प्रकरणी (Sahu Mishtan in Motipur, Muzaffarpur Case) आयकर विभागाच्या कारवाईने खळबळ उडाली आहे. दरभंगाचे बालरोगतज्ञ आणि त्यांच्या पत्नी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गुंजन शुक्ला यांच्या दोन रुग्णालये आणि दालन रिसॉर्टवर आयकर विभागाचे छापे (IT Raid) शनिवारी रात्री उशिरा संपले.
आयकर विभागाच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर, येथून १० कोटींहून अधिक टॅक्सचोरी झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. डॉक्टर दाम्पत्याची गुंतवणूक त्यांच्या उत्पन्नाशी जुळत नाही (Investment Not Match With Income). गुंतवणूक आणि उत्पन्न यात खूप फरक आहे.
[read_also content=”बिहारहून पूजा करण्यासाठी आलेले दोन मित्र शिवगंगा तलावात बुडाले, एकाचा दुर्दैवी अंत; दुसऱ्याला वाचविण्यात यश https://www.navarashtra.com/crime/shocking-news-deoghar-jharkhand-one-died-due-to-drowning-in-sivaganga-sarovar-the-other-was-rescued-the-smell-of-alcohol-was-coming-from-one-of-the-mouth-nrvb-363671.html”]
सध्या आयकर विभागाचे पथक कागदपत्रांचे मूल्यांकन करण्यात व्यस्त असून, त्यानंतरच टॅक्सचोरी निश्चित होऊ शकेल. डॉक्टर दाम्पत्याने खोट्या मार्गाने खर्च दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा तपास अजूनही सुरू आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या दोन्ही रुग्णालयांतील प्रत्यक्ष संख्येपेक्षा मोठ्या संख्येने लोकांकडून पैसे घेतल्याचे पुरावे सापडले आहेत.
त्याचवेळी दालन रिसॉर्टमध्ये १० ते १५ कोटींच्या गुंतवणुकीची बाबही समोर येत असताना कागदावर कमी गुंतवणुकीचा खुलासा डॉक्टर दाम्पत्याने केला आहे. त्याच्या बुकिंगमध्येही कर अनियमिततेचे प्रकरण समोर आले आहे. मोठी रक्कम घेऊन रिसॉर्टचे बुकिंग केले. परंतु, कागदावर ते कमी दाखवण्यात आले. जप्त केलेल्या कागदपत्रांची चौकशी सुरू आहे. त्यानंतरच टॅक्स चुकवेगिरीची नेमकी स्थिती कळेल.
[read_also content=”लखनऊत अश्लीलतेने गाठला कळस, भर रस्त्यात स्कूटीवर तरुण-तरुणीचं ओसंडून ऊतू जात होतं प्रेम, Video व्हायरल https://www.navarashtra.com/viral/lucknow-love-couple-romance-video-on-moving-scooty-viral-on-social-media-nrvb-362751.html”]
२ दिवस चाललेल्या या छाप्यात तपासादरम्यान साहू मिष्टानच्या तीन ठिकाणांहून एक कोटी ८३ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यासोबतच रोख स्वरूपात खरेदी केलेल्या घरांची व जमिनीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये एक फ्लॅट पाटण्यात तर दुसरा फ्लॅट नोएडामध्ये आहे तर दोन्ही भूखंड पाटण्यातील असल्याचे सांगितले जात आहे.