ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी एका तरुणाने २ लाख रुपये गमावले. कर्ज फेडण्यासाठी त्याने चक्क आपली किडनी विकण्याचा निर्णय घेतला. बिहारमधील ही धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
याच हाणामारीत काही भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात घुसखोरी कऱण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना हाकलून लावले आणि त्यानंतर हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली. प्रकरण वाढतच गेले. गोंधळ वाढतच गेल
बिहारमधील नालंदा येथे ग्रामस्थांनी मंत्री श्रवण कुमार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा बराच अंतर पाठलाग करून त्यांना पळवून लावण्यात आले. या हल्ल्यात सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.
बिहार विधानसभा निवडणूक संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. निवडणूक आयोग आता बिहारमधील मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या ६५ लाख लोकांची नावे जाहीर करणार आहे.
Bihar Devi Sita temple : बिहारमधील पुनौरधाम येथे बांधल्या जाणाऱ्या माता सीतेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुरु झाले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भूमीपूजन केले आहे.
बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञांनी एम्सच्या नर्सच्या घरात घुसून तिच्या दोन मुलांना जिवंत जाळलं आहे. या घटनेनंतर बिहारमध्ये खळबळ माजली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार यादी विशेष फेरपडताळणीचा मुद्दा आता हाणामारीवर आला आहे. याच मुद्द्यावरून आज बिहार विधानसभेत भाजप आणि राजदच्या आमदारांमध्ये राडा पहायला मिळाला, मार्शलनी हस्तक्षेप करूनही वाद थांबला…
लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या वर्षाअखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे बिहारमधील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
Bihar Police News : बिहार मुख्यालयाकडून पोलिसांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांना यापुढे वर्दीवर मेकअप करण्यास आणि रिल्स काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाचं भीषण वास्तव समोर आलं आहे. एका कुटुंबातील तीन महिला आणि दोन पुरुष अशा पाच जणांना जिवंत जाळण्यात आलं आहे.
एक महिला तिच्या तीन मुलांना सोडून तिच्या प्रियकरासोबत पळ काढला. महिलेने घरात ठेवलेले लाखो रुपयांचे जमिनीचे कागदपत्र आणि दागिनेही पळवून नेले. यासंदर्भात पतीने तक्रार दाखल केली आहे.
एका चित्रपटाच्या कथानकाप्रमाने थरारक ही घटना असून मृतदेहासोबत 2400 किलोमीटरचा प्रवास करण्यात आला आहे. दरम्यान संपूर्ण देशाला हादरवून टाकणारं हे प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊया...
बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील रफीगंज रेल्वे स्टेशनवर एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. ४ मुलांसह महिलेने भर स्टेशनवर विष प्राशन केलं. यात तीन मुलांचा मृत्यू झाला आहे.
भारतीय सेनेकडून पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर केले. यानंतर त्याच दिवशी जन्मलेल्या कन्येला बिहारमधील दाम्पत्याने या ऑपरेशनवरुन नाव दिले आहे.
बिहार मध्ये एक भीषण अपघात घडल्याचे समोर आली आहे. यात ८ जणांचा दुर्दैवी मृत्य झाला, तर २ जण जखमी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. हे सर्व १० जण…
कन्हैया कुमारसह, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभान आणि बिहार प्रदेश अध्यक्ष गरीब दास यांच्यासह ३० हून अधिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पटना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
बिहार लोकसेवा आयोगाने बिहारमधील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी मोठ्या प्रमाणात रिक्त पदांची घोषणा केली आहे. आरोग्य सेवेशी संबंधित शैक्षणिक विभागांना बळकटी देणे हा याचा मुख्य उद्देश
Bihar Day 2025 : 22 मार्च हा दिवस बिहारसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी राज्याचा वर्धापन दिन म्हणजेच बिहार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी बिहारच्या स्थापनेला 113…
सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज पोलीस स्टेशन परिसरातून यावेळी एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील बाजारपेठेतील खट्टर चौकाजवळ दोन मोटारसायकलींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत पाच जण गंभीर जखमी झाले.
बिहारच्या विधान परिषदेत शुक्रवारी मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी महिला सदस्यांवर चांगलेच संतापलेले पहायला मिळाले. पूर्वी महिला शिक्षित नव्हत्या. तुम्हाला शिक्षणाबद्दल काहीच माहिती नाही, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे.