Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: मोबाइलवरून ओळख; भेटण्यास नकार दिला, रात्री मागच्या दाराने घरात घुसून धक्कादायक कृत्य

मोबाइलवरून सुरू झालेली ओळख पुढे गंभीर वळणावर पोहोचली. भेटण्यास नकार दिल्यानंतर रात्री थेट महिलेच्या घरात शिरलेल्या तरुणाने धमकी देत जबरदस्ती केल्याचा आरोप आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 14, 2026 | 08:55 AM
Crime News: मोबाइलवरून ओळख; भेटण्यास नकार दिला, रात्री मागच्या दाराने घरात घुसून धक्कादायक कृत्य

Crime News: मोबाइलवरून ओळख; भेटण्यास नकार दिला, रात्री मागच्या दाराने घरात घुसून धक्कादायक कृत्य

Follow Us
Follow Us:
  • भेटण्यास नकार दिल्यानंतर रात्री मागच्या दाराने घरात शिरल्याचा आरोप
  • पती-सासऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर जबरदस्ती
  • २२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर:  मोबाइलवरून झालेली ओळख, त्यानंतर फोन आणि संदेशांमधून संवाद आणि पुढे भेटण्याचा आग्रह… मात्र, महिलेने भेटण्यास नकार दिल्यानंतर तरुणाने थेट रात्री तिच्या घरात प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव शेणपुंजी परिसरात समोर आला आहे. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूमचा दरवाजा बंद करून पती आणि सासऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सचिन अनिल राठोड (वय २२) याच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन राठोड हा काही वर्षांपूर्वी फिर्यादी महिलेच्या घराच्या परिसरात राहत होता. त्यामुळे दोघांची पूर्वीपासून ओळख होती. या ओळखीमुळे दोघांमध्ये मोबाइलवरून बोलणे तसेच संदेशांची देवाणघेवाण होत होती. दरम्यान, महिलेच्या सासऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी सचिनला परिसरातून निघून जाण्यास सांगितले होते.

भेटण्याचा आग्रह, मात्र महिलेचा नकार

१० सप्टेंबर रोजी सचिनने महिलेला फोन केला. त्याने महिलेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, महिलेने त्याला भेटण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतरही त्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्याच रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास महिलेच्या घराच्या मागील बाजूच्या दरवाजावर आवाज झाला. आवाज ऐकून महिलेने दरवाजा उघडला असता सचिन घरात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तो घरात कशाप्रकारे आला, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

बेडरूमचा दरवाजा बंद करून धमकी

घरात प्रवेश केल्यानंतर आरोपीने बेडरूमचा दरवाजा बंद केला. महिलेने आरडाओरड केल्यास तिच्या पतीसह सासऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेवर आरोपीने जबरदस्ती केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर महिलेने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सचिन अनिल राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलिस करीत असून, तक्रारीतील आरोपांची पडताळणी तसेच घटनेशी संबंधित अन्य बाबींचा तपास सुरू आहे.

Web Title: Crime news after a meeting was refused a man entered through the back door on saturday and committed a shocking act

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 08:55 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.