Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरिद्वारमध्ये भाजपच्या माजी नेत्याची हत्या, बिझनेस पार्टनरच्या मुलांनी झाडल्या गोळ्या, भावावरही हल्ला

भाजपचे माजी नेते अमरदीप चौधरी यांची उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मालमत्तेचा आणि पैशाचा व्यवहार हे खुनाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. चौधरी यांच्या व्यावसायिक भागीदाराच्या मुलांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 06, 2023 | 10:41 PM
crime news former bjp leader amardeep chowdhary shot dead in haridwar by business partners son shocking details nrvb

crime news former bjp leader amardeep chowdhary shot dead in haridwar by business partners son shocking details nrvb

Follow Us
Close
Follow Us:

हरिद्वार : भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमरदीप चौधरी यांची उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये त्यांच्या व्यावसायिक भागीदारांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास कानखल पोलिस स्टेशन अंतर्गत जगजीतपूर येथील राजा गार्डन परिसरात ही घटना घडली. मालमत्तेचा आणि पैशाचा व्यवहार हे खुनाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. खून केल्यानंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

हरिद्वार शहराचे पोलीस अधीक्षक स्वतंत्र कुमार यांनी सांगितले की, अमरदीप चौधरी यांना त्याचा मालमत्ता व्यवसायातील भागीदार राजकुमार मलिक याने हिशेब चुकते करण्यासाठी त्यांच्या घरी बोलावले होते. चौधरी त्याचा मित्र सोनू राठी सोबत मलिकच्या घरी पोहोचला जिथे दोघांमध्ये काही मुद्द्यावरून वाद झाला. त्यांनी सांगितले की, यादरम्यान तेथे उपस्थित असलेले राजकुमार यांचे दोन मुले मनदीप आणि हर्षदीप यांनी चौधरी यांच्या कंबर आणि कानावर नेम धरत गोळीबार केला.

अमरदीप चौधरीच्या साथीदारावरही हल्ला करण्यात आला

आरोपींनी अमरदीप चौधरीचा साथीदार सोनूवरही गोळीबार केला, मात्र तो कसा तरी पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याने चौधरीचा भाऊ बादल याला घटनेची माहिती दिली. बादल घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यात ते जखमी झाले. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस दलासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व जखमींना जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी चौधरी यांना मृत घोषित केले.

व्यवसायाने वकील असलेले अमरदीप चौधरी यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, मात्र ते अनेकदा त्यांच्या कृतींमुळे वादात सापडले होते. हरिद्वार जिल्ह्यात त्याच्यावर प्राणघातक हल्ल्यासह अनेक गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्यांच्यावर गँगस्टर कायदाही लावला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.

Web Title: Crime news former bjp leader amardeep chowdhary shot dead in haridwar by business partners son shocking details nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2023 | 10:41 PM

Topics:  

  • BJp leader
  • shot dead

संबंधित बातम्या

BJP Crime News: पती, पत्नी और ‘वो’! भाजप नेत्याचे कांड…; गळा घोटून पत्नीची केली हत्या
1

BJP Crime News: पती, पत्नी और ‘वो’! भाजप नेत्याचे कांड…; गळा घोटून पत्नीची केली हत्या

राज पुरोहित अन् प्रवक्ते अवधूत वाघ यांना झाला साक्षात्कार; नरेंद्र मोदी हे विष्णुचे 11 वे अवतार
2

राज पुरोहित अन् प्रवक्ते अवधूत वाघ यांना झाला साक्षात्कार; नरेंद्र मोदी हे विष्णुचे 11 वे अवतार

क्षमता १० जणांची, लिफ्टमध्ये चढले १७ जण; भाजप नेते प्रविण दरेकरही अडकले, दरवाजा तोडून केली सुटका, पाहा VIDEO
3

क्षमता १० जणांची, लिफ्टमध्ये चढले १७ जण; भाजप नेते प्रविण दरेकरही अडकले, दरवाजा तोडून केली सुटका, पाहा VIDEO

Trupti Desai : दारू पितो, दहशत माजवतो, अन् महिलांना; तृप्ती देसाईंचे भाजप नेत्यांवर गंभीर आरोप, पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी
4

Trupti Desai : दारू पितो, दहशत माजवतो, अन् महिलांना; तृप्ती देसाईंचे भाजप नेत्यांवर गंभीर आरोप, पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.