Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अति हाव नडली! शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले अन् ‘इतक्या’ कोटींना गंडवले; आरोपीला थेट ओडिशातून…

तपासादरम्यान आरोपीने वापरलेल्या आयडीएफसी बँक खात्यामध्ये ६९.७५ लाख रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. हे खाते ‘गिफ्टिंग प्लांट’ नावाने विक्रोळी, मुंबई येथे नोंदवले गेले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 08, 2025 | 06:58 PM
अति हाव नडली! शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले अन् ‘इतक्या’ कोटींना गंडवले; आरोपीला थेट ओडिशातून…
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी:  पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्याने दोन महिन्यांच्या तांत्रिक व गुप्त तपासानंतर शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून १.०७ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीस ओडिशा येथून अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव रंजन कुमार निरंजन साहु (वय ४०, रा. कटक, ओडिशा) असे आहे. यापूर्वी या प्रकरणी विक्रोळी (मुंबई) येथून गणेश महादेव लोखंडे यासही अटक करण्यात आली होती. प्राथमिक तपासात आरोपीने देशभरातील ३० नागरिकांची एकूण ₹५,०१,२९,६४५/- (पाच कोटी एक लाख) रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे खासगी नोकरी करणारे असून त्यांनी सोशल मिडियावर ‘Ventura Trading’ नावाच्या शेअर ट्रेडिंगसंदर्भातील जाहीरातीवर क्लिक केल्यानंतर त्यांना संबंधित व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले. या ग्रुपमध्ये IPO आणि स्टॉक ट्रेडिंगसंदर्भात भरघोस परतावा (१० ते ५०%) मिळेल असे सांगण्यात आले. अन्य गुंतवणूकदारांनीही गटात “नफ्याचे” स्क्रीनशॉट शेअर केल्यामुळे फिर्यादी यांनीही गुंतवणुकीचा निर्णय घेतला. या नंतर फिर्यादी यांना एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले गेले, ज्यावर नोंदणी करून त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण १.०७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

थोड्याच दिवसांत अ‍ॅपवर ३.४० कोटी रुपये नफा दाखवण्यात आला. मात्र पैसे काढण्याचा प्रयत्न करताच विविध चार्जेस सांगून टाळाटाळ केली गेली. त्यामुळे फसवणुकीचा संशय बळावल्याने फिर्यादीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या घटनेवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून, तपासासाठी निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे आणि वैभव पाटील यांचे पथक तयार करण्यात आले.

तांत्रिक तपास व आरोपींपर्यंत पोहोच

तपासादरम्यान आरोपीने वापरलेल्या आयडीएफसी बँक खात्यामध्ये ६९.७५ लाख रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. हे खाते ‘गिफ्टिंग प्लांट’ नावाने विक्रोळी, मुंबई येथे नोंदवले गेले होते. स्थानिक पोलीस ठाण्याच्या मदतीने गणेश लोखंडे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडील चौकशीत त्याने रंजन साहु व रमेश परमार या सहकाऱ्यांच्या मदतीने कोलकाता येथे रक्कम वळवली असल्याचे सांगितले. सायबर पथकाने रंजन साहु याचा सखोल तांत्रिक तपास केला असता तो सातत्याने पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम आदी राज्यांमध्ये फिरत असल्याचे आढळले. दोन महिन्यांच्या गुप्त पाहणी व मोबाईल ट्रॅकिंगनंतर पोउपनिरीक्षक प्रकाश कातकाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कटक, ओडिशा येथे जाऊन दिनांक २८ जुलै रोजी साहु याला अटक केली.

पोलिसांकडून इशारा

सायबर पोलिसांनी नागरिकांना सोशल मिडियावर शेअर ट्रेडिंग, IPO किंवा गुंतवणुकीचे आमिष दाखवणाऱ्या जाहिरातींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही गुंतवणूक करताना त्यामागील स्त्रोताची खातरजमा करावी आणि अनधिकृत अ‍ॅप्सपासून सावध राहावे.

Web Title: Cyber crime with person rs 1 crore share market pcmc police arrested in odisha crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 06:57 PM

Topics:  

  • cyber crime
  • PCMC POLICE
  • share market

संबंधित बातम्या

Stock To Buy: ‘या’ 3 बँकिंग शेअर्समध्ये गुंतवा पैसे, 33% नफ्याची हमखास हमी!
1

Stock To Buy: ‘या’ 3 बँकिंग शेअर्समध्ये गुंतवा पैसे, 33% नफ्याची हमखास हमी!

NSE: आज 4 ऑक्टोबरलाही उघडणार शेअर बाजार, वाचा Schedule, Timing; होणार मॉक ट्रेडिंग सेशन
2

NSE: आज 4 ऑक्टोबरलाही उघडणार शेअर बाजार, वाचा Schedule, Timing; होणार मॉक ट्रेडिंग सेशन

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजना आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम, 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर
3

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजना आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम, 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर

Eldeco Infrastructure IPO: दिल्लीस्थित एल्डेको इन्फ्रा 1,000 कोटींचा IPO लाँच करणार, सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल
4

Eldeco Infrastructure IPO: दिल्लीस्थित एल्डेको इन्फ्रा 1,000 कोटींचा IPO लाँच करणार, सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.