Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan Threat : मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला तो मेसेज; ‘सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…’

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) न्यायालयाने यापूर्वीच अनमोल बिश्नोईच्या अटकेसाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे आणि त्याच्या परदेशात शोध घेण्यासाठी रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 05, 2024 | 09:56 AM
Salman Khan Threat : मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला तो मेसेज; ‘सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…’
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कारवाया थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. एकीकडे लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरू असतानाच मुंबईतून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता सलमान खानला बिश्नोई गँगने पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिल्याची  माहिती समोर आली आहे. मुंबई वाहतूक पोलीस विभागाच्या कंट्रोलरुमला हा मेसेज आल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमध्.े लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ बोलत असल्याचे सांगत त्याने ही धमकी दिली आहे.  “अभिनेता सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याने मंदीरात जाऊन माफी मागावी, नाहीतर पाच कोटी रुपये द्यावेत. न दिल्यास सलमान खानला जीवे मारू, आमची गॅग आजही सक्रिय आहे.” अशी धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी या मेसेजची दखल घेत गुन्हा दाखल केला असून त्याचा शोधही सुरू केला आहे. दरम्यान, एप्रिल 2024 मध्येही  बिश्नोई गँगकडून सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धिकी यांचीही हत्या करण्यात आली.त्यामुळे सलमान खानची सुरक्षाही वाढवण्यात आली होती.

हेही वाचा: Kalhapur North Constituency: मधुरिमाराजेंच्या माघारमुळे हायव्होल्टेज ड्रामा; कोल्हापुरात नेमक काय घडलं?

लॉरेन्स बिश्नोई गुजरातच्या साबरमती तुरुंगात

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या साबरमती मध्यवर्ती कारागृहातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात आला आहे. पण त्याने आपले जाळे अशा प्रकारे पसरवले की तो तुरुंगात असो की बाहेर याने त्याला फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ असा की, तुरुंगात बसून तो अगदी सहजतेने वाटेल ते करतो. तुरुंगात बसून तो आपल्या शत्रूंच्या नावे कंत्राटे घेतो आणि तुरुंगात बसून करोडो रुपये वसूल करतो.

बिश्नोईच्या भावाची अनमोलच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरू?

सलमान खानच्या घरावर गोळीबार कऱण्याची जी घटना घडली होती. त्यामागे लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचा हात होता. गेल्या काही वर्षांपासून तोही फरार आहे. अमेरिकेत लपून बसल्याची माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेनेही त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा: “बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा…”, उद्धव ठाकरेंची ‘या’ 5 बड्या नेत्यांवर निलंबनाची कारवाई

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) न्यायालयाने यापूर्वीच अनमोल बिश्नोईच्या अटकेसाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे आणि त्याच्या परदेशात शोध घेण्यासाठी रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे.रेड कॉर्नर नोटीस ही इंटरपोल सदस्य देशांना वॉन्टेड गुन्हेगार शोधून अटक करण्याची विनंती आहे. वॉरंट व्यतिरिक्त, प्रत्यार्पणाची प्रक्रिया औपचारिक करण्यासाठी पोलिसांना न्यायालयीन कागदपत्रांची आवश्यकता आहे. क्राईम ब्रँचचा अर्ज 16 ऑक्टोबर रोजी मकोका कोर्टाने मंजूर केला असून, आवश्यक कागदपत्रे लवकरच मिळण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

एनआयएने अनमोल बिश्नोईवर 10 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे, कारण त्याच्यावर 18 गुन्हे दाखल आहेत. 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येत अनमोलचाही हात होता, असेही एजन्सीने म्हटले आहे. त्याने आरोपींना शस्त्रे आणि इतर मदत केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: ऐन विधानसभा निवडणुकीत ‘या’ दोन नेत्यांनी सोडली शरद पवारांची साथ; अपक्ष उभं राहत उमेदवारी ठेवली कायम

Web Title: Death threat to salman khan sent to mumbai police control room nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 09:55 AM

Topics:  

  • Anmol bishnoi
  • Salman Khan

संबंधित बातम्या

सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती; मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण
1

सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती; मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण

भाईजानचा व्हिडिओ चर्चेत! सलमान खानचा २४ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमँटिक डान्स, Video व्हायरल
2

भाईजानचा व्हिडिओ चर्चेत! सलमान खानचा २४ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमँटिक डान्स, Video व्हायरल

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर
3

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर

Bigg Boss 19: गौरव खन्ना कॅप्टन झाल्यांनतर काही मिनिटांतच ‘बिग बॉस’ने पलटला खेळ, ‘या’ स्पर्धकाला मिळाली कॅप्टन्सी
4

Bigg Boss 19: गौरव खन्ना कॅप्टन झाल्यांनतर काही मिनिटांतच ‘बिग बॉस’ने पलटला खेळ, ‘या’ स्पर्धकाला मिळाली कॅप्टन्सी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.