Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाझियाबादमध्ये 8 वर्षांपासून AC मेकॅनिक छापत होता बनावट नोटा, ‘एवढ्या’ कोटी रुपयांच्या नोटा छापण्याची केली होती तयारी, वाचाल तर चक्रावून जाल

दिल्ली पोलिसांनी चेन्नई येथून एका तरुणाला अटक केली आहे. हा तरुण गाझियाबादमध्ये राहत असताना गेल्या अनेक वर्षांपासून बनावट नोटा छापून त्याची विक्री करत होता. तरुण कामाच्या शोधात दिल्लीत आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यानंतर तो एसी मेकॅनिक झाला. त्यानंतर त्याला एका प्रकरणात अटक करण्यात आली. तो तुरुंगातच बनावट नोटा छापायला शिकला. आरोपी पाच कोटींच्या बनावट नोटा छापणार होता.

  • By Vivek Bhor
Updated On: May 14, 2023 | 08:00 PM
delhi crime fake notes printing in ghaziabad by ac mechanic for 8 years preparing to print currency worth 5 crores nrvb

delhi crime fake notes printing in ghaziabad by ac mechanic for 8 years preparing to print currency worth 5 crores nrvb

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) गेल्या 8 वर्षांपासून दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादच्या (Ghaziabad) लोनी परिसरात (Loni Area) बनावट नोटा (Fake Notes) छापून त्याची विक्री (Sale) करणाऱ्या एका व्यक्तीला अटक (Arrest) केली आहे. 2018 मध्ये पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली होती. दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर आरोपी कारागृहातून बाहेर येताच त्याने बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्याकडून जेवढे साहित्य जप्त केले आहे, त्यावरून सुमारे ५ कोटींच्या बनावट नोटा छापल्या जाऊ शकतात.

तुरुंगातच बनावट नोटा छापायला शिकलो

आरोपी प्रशांत उर्फ विशाल हा चेन्नईचा रहिवासी आहे. कामाच्या शोधात तो 2013 साली दिल्लीत आला होता. येथे विशाल एसी मेकॅनिक म्हणून काम करू लागला. 2015 मध्ये विशालला गाझियाबादच्या सिहानी गेट पोलिसांनी चोरीच्या दुचाकीसह अटक केली होती. त्यानंतर त्याची डासना कारागृहात रवानगी करण्यात आली. विशालची कारागृहात अमित नावाच्या कैद्याशी भेट झाली.

[read_also content=”आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचे निकाल जाहीर, यंदाच्या निकालातही मुलींचाच वरचष्मा https://www.navarashtra.com/education/icse-ssc-and-isc-hsc-exam-results-announced-this-years-result-too-girls-are-at-the-top-nrvb-399279.html”]

अमितने विशालला बनावट नोटा छापायला शिकवले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विशालने बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये पोलिसांनी त्याला बनावट नोटांसह अटक केली होती. पकडल्यानंतर विशाल जवळपास 2 वर्षे तुरुंगात राहिला आणि 2020 मध्ये बाहेर आला. यानंतर पुन्हा एकदा त्याने गाझियाबादच्या लोणी परिसरात ठाण मांडले आणि बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली.

या कारवाईत आरोपीला दिल्लीतील इंद्रप्रस्थ पार्कजवळून ताब्यात घेतले

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनुसार, त्यांना कोणीतरी बनावट नोटांच्या व्यवसायात गुंतल्याची माहिती मिळाली होती. तो केवळ 500 नाही तर 2000 च्या बनावट नोटा छापत आहे. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता विशाल नावाची व्यक्ती हे नेटवर्क चालवत असल्याचे आढळून आले.

विशाल दिल्लीतील इंद्रप्रस्थ पार्कजवळ बनावट नोटा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या भागात टेहळणी सुरू केली आणि विशालला तेथे पोहोचताच पकडले. विशालकडून सुमारे 2 लाख किमतीच्या 500 आणि 2000 च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 14 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-14-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

विशाल पाच कोटींच्या नोटा छापण्याच्या तयारीत होता

दिल्ली पोलिसांचे पथक लोणीतील विशालच्या लपण्याच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा तेथील सेटअप पाहून पोलिसांचे पथक चक्रावून गेले. प्रथम, पोलिसांनी तेथून 4 लाख 70 हजार छापील बनावट नोटा जप्त केल्या.

जप्त करण्यात आलेल्या नोटा 200, 500 आणि 2000 च्या होत्या. याशिवाय पोलिसांनी कागद, धागा आणि रंग जप्त केला असून, या साहित्यासह विशालने पाच कोटींच्या बनावट नोटा छापल्या असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल या बनावट नोटा पुढे ३० टक्के किमतीत विकायचा.

Web Title: Delhi crime fake notes printing in ghaziabad by ac mechanic for 8 years preparing to print currency worth 5 crores nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2023 | 08:00 PM

Topics:  

  • Ghaziabad

संबंधित बातम्या

१४९९ रुपयांमध्ये १ लाख फॉलोअर्स! ब्लू टिक आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या नावाखाली लावला चुना 
1

१४९९ रुपयांमध्ये १ लाख फॉलोअर्स! ब्लू टिक आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या नावाखाली लावला चुना 

धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात धक्कादायक खुलासा; मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केलं गायब
2

धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात धक्कादायक खुलासा; मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केलं गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.