Delhi's new little don, Lawrence Bishnoi's arch enemy; Who is Himanshu Bhau?
Delhi Crime News: दिल्लीतील कुख्यात गुन्हेगारांची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा हिमांशू भाऊचे नाव नेहमीच सर्वात प्रमुख गुंडांमध्ये घेतले जाते. अलिकडेच हिमांशू भाऊच्या टोळीतील १० सदस्यांना अटक करण्यात आली. ही टोळी २०२० पासून सक्रिय आहे. या टोळीवर व्यापारी, विक्रेते आणि सार्वजनिक व्यक्तींना टार्गेट करून त्यांच्याकडून खंडणी उकळणे, अपहरण आणि खून असे गुन्हे केले. त्यांनी संपूर्ण दिल्ली-एनसीआरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हिमांशू भाऊची टोळी आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळी एकमेकांचे कट्टर शत्रु असल्याची बाबही समोर आली आहे.
मोखाडा पोलिसांची तडफदार कारवाई! अवघ्या 12 तासांच्या आत खूनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक
हिमांशू भाऊ हा २१ वर्षीय गुंड आहे, जो दिल्लीचा “छोटा डॉन” म्हणून ओळखला जातो. पोलिसांच्या नोंदीनुसार, त्याच्यावर खून, खंडणी, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि ड्रग्ज तस्करीसह ३० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवाय, हिमांशू हा लॉरेन्स बिश्नोईचा प्रतिस्पर्धी मानला जातो आणि अहवालानुसार, त्याने इतर राज्यांतील टोळ्यांशी संबंध ठेवले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशू भाऊचे नेटवर्क लॉरेन्स बिश्नोईइतकेच वेगाने विस्तारत आहे. २०२२ मध्ये हिमांशू भाऊने २४ तासांत तीन हत्या केल्या होत्या.
२.५ लाख रुपयांचे बक्षीस
हरियाणा पोलिसांनी हिमांशू भाऊवर २.५ लाख रुपयांचे बक्षीस तर दिल्ली पोलिसांनी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. शिवाय, इंटरपोलनेदेखील हिमांशू विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. त्याच्या टोळीने विशेषतः मालमत्ता विक्रेते, दारू विक्रेते आणि बुकींना लक्ष्य केले आहे. टोळीचे संपूर्ण उत्पन्न खंडणी आणि खंडणीतून मिळते, जे नंतर परदेशात असलेल्या भाऊला दिले जाते.
डिसेंबर २०२३ – द्वारका येथे एका रिअल इस्टेट व्यावसायिकावर ४० हून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या आणि १ कोटी रुपयांची खंडणी मागितली .
मार्च २०२४ – पानिपतमध्ये एका दारू कंत्राटदारावर गोळीबार करण्यात आला.
मे २०२४ – टिळक नगरमधील एका कार शोरूमला लक्ष्य करण्यात आले.
जून २०२४ – राजौरी गार्डनमधील एका फास्ट फूड आउटलेटमध्ये एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
सप्टेंबर २०२४ – नरैना परिसरातील कार शोरूममध्ये आणखी एक गोळीबार.
जुलै २०२५ – दिल्ली पोलिसांच्या एका हेड कॉन्स्टेबलची खंडणी घेण्याचा प्रयत्न.
या घटनांवरून स्पष्ट होते की भाऊ टोळी सतत आपले नेटवर्क मजबूत करत आहे आणि दिल्ली आणि हरियाणामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन तरुणांना, विशेषतः अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीच्या जगात ओढणारी ‘हिमांशू भाऊ’ टोळी सध्या पोलिसांच्या रडारवर आहे. ही टोळी अल्पवयीनांचा वापर विविध गुन्हे करण्यासाठी करत असल्याची माहिती समोर आली आहे. हरियाणातील गोहाना येथे मिठाई विक्रेता मातुराम यांच्या दुकानात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आणि कोट्यवधी रुपयांच्या खंडणीप्रकरणी या टोळीचं नाव प्रथम चर्चेत आलं. या घटनेनंतर दिल्ली पोलिस, हरियाणा स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि इंटरपोल यांनी या टोळीच्या विस्तृत नेटवर्कचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी हिमांशू भाऊचा शोध तीव्र केला असून, त्याच्या ठिकाणाबाबत माहिती मिळवण्यासाठी अनेक राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे.