बीड: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास यंत्रणेने आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि त्याच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल करावा , अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी मस्साजोग येथे धनंजय देशमुख व त्यांचे कुटुंबीय मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. “या प्रकरणात आम्हाला न्याय हवा,” अशी ठाम भूमिका सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मांडली आहे.
धनंजय देशमुख यांनी कुटुंबासह मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. धनंजय देशमुख म्हणाले की, “खंडणी ते खून प्रकरणातील जे आरोपी आहेत, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. खंडणी आणि खुनाचा संबंध सीआयडीने स्पष्ट केला होता आणि त्यावरून आरोपीला 15 दिवसांचा पीसीआर दिला गेला. मात्र, जर आरोपी वाल्मिक कराडवर मकोका आणि 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही, तर मी उद्या सकाळी दहा वाजता मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे.
चोरट्यांनी दानपेटीवरच मारला लाखो रुपयांचा डल्ला; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पळवला
“जर या आरोपींना शिक्षा झाली नाही, तर ते माझा आणि माझ्या कुटुंबियांचाही खून करतील. त्यामुळे माझ्या कुटुंबाला न्याय मागण्यासाठी कुणीही उरणार नाही. उद्या सकाळी दहा वाजता मी स्वत: टॉवरवर चढून स्वतःचा आयुष्य संपवून घेईन. संतोष देशमुख यांची हत्या खंडणीमुळेच झाली आहे. 6 तारखेला हे लोक खंडणी मागायला आले होते, आणि 28 मे पासून माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंतचा काळ हा पूर्णपणे खंडणीशी संबंधित होता. या आरोपींचा काही वेगळा हेतू नव्हता. जर आम्हाला न्याय मिळत नसेल किंवा संपूर्ण माहिती दिली जात नसेल, तर माझ्या कुटुंबासमवेत हा निर्णय घेणं मला योग्य वाटतं.” असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
“सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे, पण जर यंत्रणा माहिती लपवत असेल किंवा आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर आमच्या न्याय मागणीचा काहीच उपयोग नाही, असं म्हणत त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली आहे. तसेच, “खंडणी ते खूनापर्यंतचा संबंध असलेल्या आरोपींना न्यायालयीन शिक्षेपर्यंत पोहोचवलेच पाहिजे. अन्यथा मी आणि माझे कुटुंब टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे.”
जिने मोठं केलं, वाढवलं तिलाच त्याने जीवे मारलं; आईच्या डोक्यात हंडा घालून मुलाने केली हत्या