आईला मारहाण केल्याने मुलाने वडिलांना दगडाने ठेचले; बुलडाण्याच्या चिखलीतील घटना (संग्रहित फोटो)
सातारा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. क्षुल्लक कारणांवरून खून, खुनाचा प्रयत्न, बेदम मारहाण यांसारखे प्रकार होत आहेत. असे असताना आता जेवण न वाढल्याने संतापलेल्या मुलाकडून आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हेदेखील वाचा : साडे चार लाखांच्या आर्थिक व्यवहारातून तरुणीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या, पुण्यातील धक्कादायक घटना
सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील दहिवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंगळी बुदुग गावात शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता जाधव (वय ५२) घरात झोपल्या असताना मुलगा विशाल जाधव (वय ३२) दारू पिऊन घरी आला आणि जेवण वाढण्यास सांगितले. परंतु, खूप उशीर झाल्यामुळे आईने ‘तू तुझे वाढून घे’, असे म्हटले.
यावरूनच त्याने आईला शिवीगाळ, मारहाण करण्यास सुरूवात केली. घरातील स्टीलच्या हंड्याने आईच्या डोक्यात जोरदार पहार केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी साताऱ्यात आणण्यात आले. परंतु, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
पोटच्या मुलाने गाठली क्रूरतेची परिसीमा
या घटनेची माहिती मिळताच दहिवडीच्या पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे माण तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे. पोटच्या मुलाने क्रुरतेची परिसीमा गाठल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आरोपी विशाल आनंदराव जाधव हा लपून बसला होता. त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार यांच्या पथकाने शोधून काढले आणि ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला न्यायाधीशांनी पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती मिळाली आहे.
पैशांच्या वादातून महिलेवर हल्ला करून खून
कर्जाच्या वादातून बीपीओमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची तिच्या सहकाऱ्याने हत्या केली. धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिला बीपीओ कर्मचारीचा रुग्णालयात मृत्यू झाला. पुण्यात मंगळवारी (7 जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली. बहुराष्ट्रीय बीपीओ कंपनीच्या पार्किंगमध्ये घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून महिलेचा तिच्या कार्यलयातील पुरुष सहकाऱ्याने तिच्यावर अनेकवेळा हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामध्ये तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. यामुळे महिलेचा मृत्यू झाला.
हेदेखील वाचा : Pune Crime: पोलिसांनी जप्त केला अफुच्या बोंडाचा चुरा; आरोपीवर NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल