'ती' कॉलर ट्यून ठरतीये फायद्याची; 'डिजिटल अरेस्ट'च्या प्रकरणांमध्ये दोन महिन्यांत झाली घट
पुणे: पुण्यात सायबर चोरट्यांनी ६९ वर्षीय एक ज्येष्ठ महिलेला डिजिटल अॅरेस्टची धमकी देत साडे दहा लाख रुपये ठकवल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी महिलेला सांगितले की, तिच्या बँक खात्याचा वापर काळ्या पैशाच्या व्यवहारासाठी केला आहे आणि यामुळे तिला अटक होऊ शकते. त्यानंतर, कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे भरण्याची धमकी दिली. भितीच्या कारणाने, महिलेनं बँक खात्यात पैसे जमा केले. गेल्या दीड महिन्यात चोरट्यांनी महिलेकडून साडे दहा लाख रुपये उकळले आहेत. याबाबत खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक गजानन चोरमोले तपास करत आहेत.
याचप्रमाणे, भारती विद्यापीठ भागातील एका तरुणीची साडे दहा लाख रुपयांची फसवणूक डिजिटल अॅरेस्टची धमकी देऊन करण्यात आली. चोरट्यांनी तिच्या मोबाइलवर संपर्क साधून काळ्या पैशाच्या व्यवहाराची कारवाई दाखवून पैसे उकळले. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करत आहेत.
नालासोपऱ्यात खंडणीप्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर आणि त्याच्या तीन साथीदारांना पोलीसांनी अटक केली आहे. माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर आणि त्यांचे तीन साथीदार बांधकाम व्यावसायिक आकाश गुप्ता यांच्यावर माहिती अधिकाराखाली अर्ज टाकून ब्लॅकमेल करत होते. त्यामुळे या बिल़्डरने खंडणीची तक्रार दाखल केली.
बिल्डर गुप्ता यांनी सांगितलं की, वरळी येथील बांधकाम प्रकल्पासह बांदेकर आणि त्याचे साथीदार हिमांशू शहा,किशोर आणि निखिल यांनी एसआरए प्रकल्पांशी संबंधित विविध विभागांमध्ये अनेक आरटीआय अर्ज दाखल केले होते. त्यामुळे याप्रकरणी त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी मला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.हे सर्व अर्ज थांबवण्यासाठी या चौकडीने 10कोटी रुपयांची मागणी माझ्याकडे केली.त्यानंतर त्यांच्यासोबत अनेकदा चर्चा करुन दिड कोटी रुपयांवर तडजोड झाली.अशी तक्रार बिल्डर गुप्ता यांनी नवघर पोलीस ठाण्यात केली होती.या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर त्यात तथ्य असल्याचे पोलीसांना दिसून आले.त्यानंतर सापळा रचून पोलीसानी १५ लाखांचा पहिला हप्ता घेण्यासाठी बांदेकर आणि त्यांच्या साथीदारांना मीरा रोड- नवघर परिसरातील एका हाॅचेलमध्ये बोलावले होते.
पुणे शहरातील कात्रज भागात अमली पदार्थ विक्री करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. मागील काही दिवसांपासून अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येत असून, आजच्या कारवाईत एक लाख रुपये किंमतीचे चरस, मोबाइल आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कात्रजच्या मांगडेवाडी परिसरात करण्यात आली.