
प्रदीप शर्मा यांनी राज ठाकरेंशी संबंधित एका महत्त्वाच्या घटनेचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, ” मी आणि माझा मित्र अविनाश धर्माधिकारी कांदिवली क्राइम ब्रँचमध्ये काम करत होतो. मी याबाबत डिटेल्स देऊ शकत नाही कारण हे ऑपरेशनचा एक भाग होते. आम्ही दहा-बारा नंबर हेड ऑफिसला लावले होते, जे इंटरसेफ करत होते, आणि अचानक राज ठाकरेंबाबत चर्चा सुरू झाली. त्यांना कोकण दौऱ्यावर धोका होता. ही संपूर्ण माहिती आम्ही जॉईंट सीपी क्राईम मीरा बोरवणकर यांना दिली, त्यांनी कमिश्नर यांना सांगितले, आणि त्यानंतर राज ठाकरेंना देखील माहिती देण्यात आली. त्यानुसार त्यांनी कोकण दौऱ्यावर जाणे टाळण्याचा निर्णय घेतला.”
त्यानंतर मंत्री नारायण राणे यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला होता. त्यांनाही नेहमीच दाऊद टोळीकडून धमक्या दिल्या जात होत्या. त्यामुळे, त्यांची सिंधुदुर्ग किंवा इतर ठिकाणी भेट होती, पण आम्ही दिलेल्या माहितीनंतर त्यांनी तो दौरा रद्द केला.” असंही प्रदीप शर्मा यांनी सांगितले.
BCCI कडून निवड समितीत मोठे बदल! प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी
प्रदीप शर्मा यांनी इक्बाल कासकरच्या अटकेची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “दाऊदचा धाकटा भाऊ इक्बाल कासकर अजूनही मुंबईत राहतो. त्याला दुबईहून हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईत एका प्रकरणात त्याला अटक झाली आणि बाहेर आल्यावर तो ठाण्यात खंडणी रॅकेट चालवत होता. त्यावेळी माझी पोस्टिंग त्या ठाण्यात झाली होती. आम्ही या रॅकेटचा तपास सुरू केला. तपासादरम्यान इक्बाल सापडला. तो नागपाडा येथे बहिणीच्या घरी राहत होता, जिथे ८-१० लोक त्याच्यासोबत होते. पोलिस क्वचितच तिथे जात, आणि जर कोणी गेले तर त्याला कळवले जात असे.”
त्यांनी पुढे सांगितले, “मी माझ्या ३-४ खाजगी माणसांना त्याच्यावर ८-१० दिवस लक्ष ठेवण्यास सांगितले. शेवटी एके दिवशी आम्ही गेलो आणि इक्बालच्या माणसाला आमच्यासोबत घेऊन त्याच्या दाराजवळ उभे केले. त्याने आतून पाहिले की त्याचा माणूस दारात उभा आहे आणि दार उघडले. आत गेल्यावर इक्बाल शालीमार रोडवर बिर्याणी खात होता. मी त्याला सांगितले, ‘चला, इक्बाल भाई, तुमचा वेळ संपला आहे.’ त्याने विचारले, ‘मी बिर्याणी खाऊ का?’ मी सांगितले, ‘हो, खा.’ त्यानंतर त्याला सहज अटक करण्यात आली आणि ठाण्यात आणले.”
ही घटना २०१७ मध्ये घडली होती आणि इक्बाल कासकर आजही तुरुंगात आहे.