Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तासगावमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट; सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली, कारवाईकडे सबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष

तासगाव तालुक्यातील विविध गावांमधील भरणाऱ्या आठवडा  बाजारामध्ये या बनावट  नोटा  आणणारी टोळी फिरते, असा संशय व्यक्त होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 25, 2024 | 02:35 AM
तासगावमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट; सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली, कारवाईकडे सबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष
Follow Us
Close
Follow Us:
तासगाव/ मिलिंद पोळ:  तासगांव  शहर तालुक्यात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. कोणाकडून तरी आलेली बनावट नोट सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यांनाच राष्ट्रीयीकृत  व खाजगी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून अपमान आर्थिक तोटाही सहन करावा लागत आहे. बनावट नोटांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई आवश्यक असताना संबंधित  यंत्रणेचेच याकडे दुर्लक्ष आहे. तासगांव तालुक्यात  गेल्या अनेक महिन्यांपासून बनावट नोटा आढळण्याचे प्रमाण वाढले आहे.
बनावट नोटा वापरणारी टोळी तासगाव तालुक्यात कार्यरत आहे का.? अशी शंका सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. सुटे पैसे मागण्याचा बनाव करून खोटी नोट देऊन व्यापाऱ्यांना फसवले जाते. शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे अपटूडेट पोशाख असलेले हे लोक बाजारात बनावट नोटा चालवत आहेत.
बनावट नोट सामान्य माणसाला लगेच ओळखू येत नाही. बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर अनेकांना तुमची ही नोट बनावट आहे असे अधिकारी सांगतात. त्या नोटेवर लाल रंगाच्या पेनने फुली मारून संबंधिताचे नाव पत्ता घेऊन बनावट नोट जमा करण्याचे काम बँकेचे अधिकारी करतात. राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी तर अशी नोट फाडूनच टाकतात. ग्राहकाने नोट परत मागितली, तरी दिली जात नाही. त्याचा आर्थिक तोटा होत असतानाच अधिकारी अरेरावीच्या भाषेत ‘पंचनामा करून फिर्याद देऊ का’, असा दम देतात. त्यामुळे सामान्य माणूस निमूटपणे हा प्रकार सहन करतो.
सामान्यपणे रोजच्या व्यवहाराच्या निमित्ताने एखादी तरी नोट बनावट येतेच. बँकेचे अधिकारी नोट जमा करून घेतात हा सर्वसामान्य माणसावरील अन्याय तर आहेच, पण आर्थिक तोट्यावरून बँक अधिकाऱ्यांनी सर्वांसमोर केलेला अपमान जिव्हारी लागणारा असतो.   पोलिसांनी व्यापाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास वाचवण्यासाठी बनावट नोटा बाजारात आणणाऱ्या टोळीचा तपास करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बनावट नोटांना आळा घातला नाही, तर गुन्हेगारांचे चांगले फावून निरपराध लोक अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कारवाई करण्याची मागणी

बनावट नोटांमध्ये पाचशे व शंभर रुपयांच्या  नोटांचा समावेश आहे. तासगाव तालुक्यातील विविध गावांमधील भरणाऱ्या आठवडा  बाजारामध्ये या बनावट नोटा  आणणारी टोळी फिरते, असा संशय व्यक्त होत आहे. पोलिस यंत्रणेकडे या गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: पुणे शहरात बनावट नोटा आढळल्याने खळबळ; गुजरातमधील एकाला अटक

पुणे शहरात बनावट नोटा आढळल्याने खळबळ

पुणे शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या रस्ता पेठेत बनावट नोटा बाळगणाऱ्या एकाला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा गुजरातमधील जामनगरचा आहे. त्याच्याकडून ५०० रुपये दराच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार रुपयांच्या बनावट आणि हुबेहूब दिसणाऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गौरव रामप्रताप सविता ( वय २४, रा.जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई लखन गंगाधर शेटे यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: Fake note in tasgaon taluka demand to police strict action against crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Tasgaon Crime

संबंधित बातम्या

तासगावात महिला वाहतूक पोलिसाशी गैरवर्तन, तरुणावर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
1

तासगावात महिला वाहतूक पोलिसाशी गैरवर्तन, तरुणावर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

Tasgaon Crime News: तासगाव पोलिसांची मोठी कामगिरी! ट्रॅक्टर, ट्रॉली चोरणारी टोळी पकडली; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Tasgaon Crime News: तासगाव पोलिसांची मोठी कामगिरी! ट्रॅक्टर, ट्रॉली चोरणारी टोळी पकडली; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Tasgaon Crime : ग्रामसभेत प्रश्न विचारला म्हणून एकावर हल्ला; लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
3

Tasgaon Crime : ग्रामसभेत प्रश्न विचारला म्हणून एकावर हल्ला; लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

मटकाकिंग मालामाल, आकडेबहाद्दर कंगाल; पोलिसांची भिस्त हरवली?
4

मटकाकिंग मालामाल, आकडेबहाद्दर कंगाल; पोलिसांची भिस्त हरवली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.