कवठेएकंद गावात अलीकडेच झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर तासगाव पोलिसांनी मंगळवारी मोठी कारवाई केली. या छापेमारीत पोलिसांनी तब्बल ४ लाख ४५ हजार रुपयांचा बेकायदा दारूसाठा जप्त केला आहे.
हातनूर (ता. तासगाव) येथील दत्तात्रय नामदेव पवार यांच्या घराजवळून २६ एप्रिल रोजी एक डंपींग ट्रॉली अज्ञाताने चोरून नेली होती. त्यांनी याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
लोढे (ता. तासगाव) येथील ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेत प्रश्न विचारल्याने चिडून जाऊन सरपंच व त्यांच्या साथीदारांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
तासगाव शहरातील बागवान चौक, विटा नाका, गोटेवाडी रस्ता, कॉलेज चौक या भागात तर तालुक्यातील सावळज, मनेराजुरी, मांजर्डे, येळावी भागात मटका आणि जुगाराचे अड्डे चांगलाच रंग धरु लागले आहेत.
खुबीकर यांनी ओंकार याची मोटरसायकल त्याकडे असणाऱ्या पिशवीची झडती घेतली. त्यावेळी शासनाच्या वतीने प्रतिबंधित केलेला पान मसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा व केशरयुक्त सुगंधी सुपारी असा एक लाख रुपये किमतीचा माल…
सुनील होळकर हे जुना सातारा बायपास रस्त्यावर शनिवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी नंबरप्लेट नसलेली पिकअप येरळा नदीपात्राकडून येऊन बायपास रस्त्याने मणेराजुरीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती.
तासगाव शहरातील एका वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित रजनीकांत भाऊसाहेब देवकुळे (वय ४३) याच्याविरोधात तासगाव पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
तासगाव येथील दत्त माळावर वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर तासगाव पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला.
तासगावातील अशोक अँन्ड सन्स ज्वेलर्स दुकानातील चोरीचा छडा लावण्यात अवघ्या बारा तासांत पोलिसांना यश आले आहे, तर चोरीस गेलेल्या सर्व दागिन्यांसह २ लाख, ७८ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला…