पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले
सांगली : सांगलीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला पोलीस लाच घेताना हाती आले आहे. सांगलीमध्ये पोलिसांना रंगेहात पकडले आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना विश्रामबाग पोलिस ठाण्यातील महिला हवालदार यांना पकडले आहे. अटक करण्यात आलेल्या महिला पोलीस हवालदाराचे नाव मनिषा नितीन कोंगनोळीकर उर्फ भडेकर (वय ४२, रा. शारदानगर, सांगली) असे आहे. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.
एका फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी व चौकशीत मदत करण्यासाठी मनिषा कोंगनोळीकर यांनी एका व्यक्तीकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारण्यासाठी मंगळवारी सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाजवळ त्यांनी तक्रारदारास बोलावले. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानुसार विभागाच्या पथकाने सांगलीवाडीत सापळा रचला होता. तक्रारदाराकडून कोंगनोळीकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी कोंगनोळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्राईम न्यूज वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे, अंमलदार सीमा माने, विना जाधव, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अजित पाटील, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, अतुल मोरे यांनी ही कारवाई केली आहे.
नागरिकांनी तक्रार द्यावी: लाचलुचपतचे आवाहन
लोकसेवकाने लाचेची मागणी केली तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अथवा १०६४ या हेल्पलाईन व्हॉटसॲप क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील यांनी केले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तासगावमध्ये खुनी हल्ला
तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्ववैमनस्यातून सहा जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडला. हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके (वय 24) या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकाराने वायफळे येथे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी व दवाखान्यात भेट दिली व जखमींची विचारपूस केली. गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहेत. याच वादातून या कुटुंबांमध्ये बऱ्याच वेळेला भांडणे झाली होती. भांडणाचे पर्यावसन अनेक वेळा मारामारीत झाले होते. दोन्ही कुटुंबातील एकमेकांवर यापूर्वीही धारदार शस्त्राने हल्ले झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. यातूनच वादावादीचा प्रकार घडत होता. हा वाद मिटवण्याचाही बऱ्याच वेळा प्रयत्न झाला. मात्र तो अयशस्वी ठरला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता.