Photo Credit- Social Media
नागपूर: मागील अडीच वर्षांपासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. सध्या नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महायुतीत हालचालीनां वेगही आहे. शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे सध्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. त्यामुळे यावेळी त्यांना पदोन्नती मिळणार की विधानपरिषदेच्या सभापती पदावर नव्या व्यक्तीची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेचे सभापतीपद भाजप नेते राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठीही महायुतीतील तीनही घटकपक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. तीनही घटक पक्षातील काही नेते विधानपरिषदेया सभापतीपदासाठी गुडद्याला बांशिंग बांधून बसले आहेत.
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन तापतंय; विरोधी आमदारांची संख्या कमी असली तरी विरोध मात्र तीव्र
मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे सध्या या सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. तर भाजपकडून राम शिंदे, निरंजन डावखरे या दोन्ही नेत्यांनाही विधानपरिषदेच्या सभापतीपदे वेध लागले आहेत. भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद आहे.तर एकनाथ शिंदे यांच्याकडे विधान परिषदेचे उपसभापतीपद आहे. त्यामुळे विधानपरिषदचे सभापतीपद भाजप आपल्याकडे ठेवणार की शिंदे गटाला मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळाच उत्सुकता आहे.
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक यांची मुदत 2022 मध्ये संपली. त्यानंतर हे पद रिक्त होते. त्यानंतर आता महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारमध्ये या पदासाठी निवडणूक होणार आहे. आगामी काळासाठी हे पद फार महत्त्वाचे आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता या पदासाठी चुरस वाढली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे.
पोटावर वाढलेली चरबी आणि वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतील ‘ही’ हिरवी पाने
राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित केली जाईल. त्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयांकडून निवडणुकीची तारीख निश्चित करण्यासाठी पत्र दिले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या हिवाळी अधिवेशनात निवडणुकीची तारीख कळवण्याबाबत राज्यपालांना पत्र देतील. त्यानंतर राज्यपाल पुढची कार्यवाही करतील. महाराष्ट्रातील विधान परिषद हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे. महाराष्ट्रसह, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार या 6 घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे.
विधान परिषदेतील 78 सदस्यांपैकी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) 19, काँग्रेसचे 7, शिवसेना (यूबीटी) सात, शिवसेना सहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी पाच आणि प्रत्येकी तीन सदस्य आहेत. स्वतंत्र सदस्य आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ऑक्टोबरमध्ये राज्यपालांच्या कोट्यातील 12 रिक्त जागांपैकी सात जागांसाठी विधान परिषदेचे सदस्य (MLC) म्हणून सात नावांना मंजुरी दिली होती.
उरले काही दिवस! ‘या’ तारखेला लाँच होणार Bajaj Chetak Electric Scooter
लोकसभा निवडणुकीत एनडीएला महाराष्ट्रात 48 पैकी 17 जागा मिळाल्या. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी महायुतीने 235 जागा जिंकल्या आहेत. अशा स्थितीत सर्वेक्षणादरम्यान दोन्ही राज्यातील जनतेला याबाबत विचारले असता, अत्यंत धक्कादायक उत्तरे आली.