Female police officer murdered after entering house in Amravati
Amravati Crime News: अमरावती शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुकृपा कॉलनी येथे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने अमरावती पोलीस दलात तसेच शहरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव आशा घुले (वय ३८) असे असून त्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. तर त्यांचे पती SRPFमध्ये कार्यरत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अज्ञात व्यक्तीने घरात घुसून त्यांची गळा दाबून हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे डीसीपी गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू असून काही संशयितांवर देखरेख ठेवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Nagpur news: ट्रस्टच्या नावावर बनावट बिले; विकासकामांचा निधी लाटला; मनसेचे गंभीर आरोप
आशा घुले यांचे पती SRPFमध्ये कार्यरत आहेत. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली आणि कोणत्या व्यक्तीने केली, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी मृतदेह तात्काळ पोस्टमार्टमसाठी पाठवला असून घटनास्थळी साक्षी-पुरावे जमा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संशयितांवर लक्ष ठेवले जात आहे. ही घटना संपूर्ण परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे.
त्याचवेळी दुसरीकडे, शहरातील शंकर नगर परिसरात युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी निलेश भेंडे यांच्यावर दोन अज्ञात इसमांनी चाकूने जिवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या छाती, हात आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर सध्या रेडियंट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना अचानक घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी निलेश भेंडेंवर वार करून तेथून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.