Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसांची बदनामी केल्याबद्दल नवाजुद्दिन सिद्दीकीवर गुन्हा दाखल करा, सुराज्य अभियानाची मागणी

पोलिसांचा गणवेश परिधान करुन अवैध जाहिरातीचा प्रसार करत असल्याचा आरोप अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीवर करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 22, 2024 | 03:27 PM
पोलिसांची बदनामी केल्याबद्दल नवाजुद्दिन सिद्दीकीवर गुन्हा दाखल करा, सुराज्य अभियानाची मागणी

पोलिसांची बदनामी केल्याबद्दल नवाजुद्दिन सिद्दीकीवर गुन्हा दाखल करा, सुराज्य अभियानाची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

भारत राजनकर : महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश परिधान केलेला सिनेअभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी लोकांना जुगार खेळण्याचे आवाहन करत असल्याची धक्कादायक जाहिरात समोर आली आहे. ही जाहिरात ‘बिग कॅश पोकर’ (Big Cash Poker) या ऑनलाईन ॲपने केली आहे. जे पोलीस खाते जुगार खेळणार्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करते, त्याच पोलिसांच्या वेशात अशी जाहिरात केली जाते, हे महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलीन करणारे आणि धक्कादायक आहे. हिंदु जनजागृती समितीचे ‘सुराज्य अभियान’या संस्थेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या जाहिरातीकडे दुर्लक्ष केले, तर अनेक अवैध, अनैतिक गाष्टींच्या जाहिरातींसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशाचा वापर केला जाऊ शकतो.

हेही वाचा-जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

ऑन ड्युटी’ आणि गणवेशात असतांना पोलीस जुगार खेळण्याचे आवाहन करतांना दाखवणे, हे अवघ्या महाराष्ट्रासाठी लज्जास्पद असून ‘बिग कॅश पोकर’ ऑनलाइन ॲपवर महाराष्ट्र पोलिसांनी तत्परतेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘सुराज्य अभिमाना’ने केली आहे.या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे १४ ऑक्टोबर २०२४ या दिवशी तक्रार केली आहे. यामध्ये ‘बिग कॅश पोकर’चे मालक अंकुर सिंघ, व्यवस्थापक आणि विज्ञापनात काम करणारे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यावर गुन्हा नोंदवावा, तसेच ‘महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियम १९७९’ आणि ‘महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१’ द्वारे कठोर कारवाई करावी, अशी मागणी अभिषेक मुरुकटे यांनी केली आहे.

हेही वाचा-गडचिरोलीत सुरक्षा दलाची मोठी कारवाई, चकमकीत ४ नक्षलवादी ठार

महाराष्ट्र पोलीस कठोर परिश्रम आणि प्रशिक्षण यांतून तयार होतात; मात्र या जाहिरातीतून ‘ऑनलाईन जुगारामुळे’ त्यांच्यात ‘स्कील’ येते, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस दलातील कोणालाही स्वतःहून या ॲपवर कारवाई करावीशी वाटली नाही ? या संदर्भात इतरांना तक्रार द्यावी लागत आहे, हे दुर्दैवी असल्याचेही मुरुकटे या वेळी म्हणाले. या प्रकरणी पोलीस खात्याचे प्रमुख म्हणून गृहमंत्र्यांनीही लक्ष घालावे, अशी मागणीही ‘सुराज्य अभियाना’ने केली आहे.

 

Web Title: File a case against nawazuddin siddiqui for defaming the police surajya abhiyan demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 03:27 PM

Topics:  

  • Nawazuddin Siddiqui

संबंधित बातम्या

थरारक अनुभवासाठी सज्ज व्हा; गुन्हेगारी आणि रहस्याने भरलेला चित्रपट, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?
1

थरारक अनुभवासाठी सज्ज व्हा; गुन्हेगारी आणि रहस्याने भरलेला चित्रपट, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.