
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
पीसीत महिला ही नेहमीप्रमाणे घटनेच्या दिवशी दिवसभर कर्तव्य बजावत होती. संध्याकाळी ती मुलचेरा येथील घरी परतल्यानंतर ती प्रचंड तणावात दिसत होती असे तिच्या पतीने सांगितले. जेवण झाल्यानंतर पतीला डुलकी आली ते झोपी गेले. दरम्यान, तिने विष प्राशन केले. वेळेत ही बाब लक्षात येताच पतीने महिलेला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे.
अधिकाऱ्यावर याआधीही गंभीर आरोप
पीडित परिचारिकेचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर याआधीही गंभीर आरोप करण्यात आले आहे. पाच महिन्यांपूर्वी मुलचेरा तालुक्यात डेंगूच्या साथीच्या काळात उपचारातील निष्काळजीपणामुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या वेळीही त्याच अधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाले होते. मात्र वरिष्ठांच्या पाठबळामुळे कोणतीही कारवाई न झाल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू होती. त्यामुळे या नव्या प्रकरणाने कर्मचाऱ्यांमध्ये रोष अधिक वाढला आहे.
आरोग्य अधिकारी यांची भेट
या घटनेनंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली. परिचारिका उपचारात असल्याने संवाद होऊ शकला नाही, मात्र तिच्या पतीकडून संपूर्ण माहिती घेतली. उपलब्ध चॅट आणि इतर पुराव्यांवर आधारित सविस्तर अहवाल शासनाला पाठविण्याची माहिती सीईओंनी दिली आहे. आरोग्य विभागाने अद्याप या प्रकरणात अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही आहे. आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
Nashik Accident: दुःखद! सप्तश्रृंगी घाटात इनोव्हा 600 फूट खोल दरीत कोसळली; 6 भाविकांचा मृत्यू
Ans: दोन वर्षांच्या मानसिक छळ, अश्लाघ्य मागण्या आणि वेतनवाढ रोखल्यामुळे त्रस्त होऊन.
Ans: वेळेत उपचार मिळाल्याने जीवित धोका टळला असून प्रकृती स्थिर आहे.
Ans: पुराव्यावर आधारित अहवाल शासनाला पाठविला जात आहे, अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी वाढली आहे.