कसा झाला अपघात?
रविवारी गीताताई हिंगे या त्यांच्या खासगी कामासाठी नागपूरला गेल्या होत्या. रात्री उशिरा गडचिरोलीकडे परत येताना पाचगावजवळ त्यांच्या चारचाकीला समोरून येणाऱ्या वाहनाने जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पतींना किरकोळ दुखापती झाली. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीला सुरवात केली. पोलीस पथकाने घटनास्थळी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे.
गीताताई हिंगणे यांचा राजकीय प्रवास
गीताताई हिंगे या नुकताच राष्ट्रवाद काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये दाखल झाल्या होत्या. 26 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांच्या प्रवेशानंतर लगेच त्यांची महिला प्रदेश उपाध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली. गीताताई हिंगे या पूर्वी भाजपमध्ये अत्यंत सक्रिय पदाधिकारी म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी भाजपच्या जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा महामंत्री अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपला रामराम केला. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या आगमनाने पक्षाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
सामाजिक उपक्रमांत महत्त्वाची भूमिका
गीताताई हिंगे या राजकारणाबरोबरच सामाजिक उपक्रमात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्या ‘आधार विश्व फाउंडेशन’च्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या आणि या संस्थेमार्फत अनेक गरीब व गरजू कुटुंबांना मदत केली. त्यांनी विशेषत: कोरोना काळात त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन अन्नधान्य, औषधे आणि अन्य आवश्यक साहित्य गरजूंना पोहोचवले. त्यांच्या या कामाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली होती. त्यांच्या निधनाने गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Nashik Accident: दुःखद! सप्तश्रृंगी घाटात इनोव्हा 600 फूट खोल दरीत कोसळली; 6 भाविकांचा मृत्यू
Ans: पाचगावजवळ समोरून आलेल्या वाहनाच्या धडकेत त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.
Ans: पूर्वी भाजप पदाधिकारी, 2025 ला राष्ट्रवादीत प्रवेश, नंतर महिला प्रदेश उपाध्यक्षा नियुक्ती.
Ans: ‘आधार विश्व फाउंडेशन’च्या अध्यक्षा, गरीब-गरजूंना मदत, कोरोना काळात मदतकार्य.






