राजकोट : जन्मदात्या पित्याच्या क्रौयाच्या (Father’s Cruelty) अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या, वाचल्या असतील पण गुजरातमध्ये राजकोट येथे (Rajkot, Gujrat) घडलेल्या या घटनेनं सगळेच आचंबित झालेले आहेत. अडीच वर्षांची मुलगी रडते, त्यामुळे नाराज असलेल्या सावत्र बापानं (Step Father) थेट तिची हत्याच (Murder) केलीय. इतकंच नाही तर तिच्या मृत्यूनंतर त्यानं भररस्त्यातून तिचा मृतदेह कडेवर नेला आणि झाडीत तिचा मृतदेह फेकून तो घरी परतला. याचं सीसीटीव्हीही फुटेज समोर आलं असून, त्यात हा क्रूरकर्मा आपल्या मुलीचा मृतदेह कडेवर घेऊन जाताना स्पष्ट दिसतोय.
या आरोपीनं मुलगी रडत असताना संतापून तिचं डोकं जोरात भिंतीवर आपटलं, त्यानंतर तिचा गळा आवळला. मुलीचा मृतदेह झाडीत फेकल्यानंतर काहीच घडलं नसल्याच्या अविर्भावात तो घरीही परत आला. त्यानंतर त्याची पत्नी मुलीची शोधाशोध करु लागली. त्यावेळी मुलगी हरवल्याची खोटी कहाणी त्यानं तिला ऐकवली आणि तिच्यासोबत तो मुलीला शोधण्याचं नाटकही करत होता.
या आरोपी पित्यानं शुक्रवारी रात्री मुलगी बेपत्ता जाल्याची तक्रार पत्नीसह पोलीस स्टेशनमध्ये येऊन दिली. त्यानंतर आठवडाभराने या मुलीचा मृतदेह गोंडल चौकात एका झाडीत पोलिसांना सापडला. प्राथमिक चौकशीत मुलीचा गळा दाबून तिची हत्या केल्याचं निष्पन्न झालं.
[read_also content=”आई आहे की कैदाशीण! फ्लॅटमध्ये २० वर्षांच्या अविवाहित मुलीने दिला बाळाला जन्म, बदनामी होऊ नये म्हणून बाळालाच दिलं खाली फेकून, झाला मृत्यू https://www.navarashtra.com/crime/crime-unmarried-girl-gave-birth-to-a-child-in-new-ashok-nagar-delhi-and-threw-it-down-from-washroom-window-nrvb-360680.html”]
मुलीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी या परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यांचं फुटेज तापसण्यास सुरुवात केली. यात शनिवारी दुपारच्या वेळी हा नराधम पिता आपल्या मुलीचा मृतदेह हातावर घेऊन जात असताना सीसीटीव्हीत दिसला. दरम्यान तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. त्याचं मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यानंतर आजूबाजूच्या शहरातील क्राईम ब्रँचच्या टीमनं एकत्रित त्याचा शोध घेतला. अखेरीस सोमवारी संध्याकाळी मोहसाना रेल्वे स्चेशनवरुन आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी उ. प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत होता.
या नराधम पित्याचं नाव आहे अमित गोर. पोलिसांनी केलेल्या चौकौशीत त्यानं अनन्या ही त्याची सावत्र मुलगी असल्याचं कबूल केलं. शुक्रवारी संध्याकाळी ती तिच्या आीकडं जाण्यासाठी हट्ट करत होती. अमितने नकार दिला तेव्हा तिनं रडण्यास सुरुवात केली. तिचं रडणं थाबंवण्याचा अमितनं प्रयत्न केला मात्र त्यात त्याला यश आलं नाही. त्यामुळं रागात त्यानं तिचं डोकं भिंतीवर आपटलं. त्यानंतर गळा दाबून त्यानं त्या अडीच वर्षांच्या लहानगीची हत्या केली. यावेळी त्या मुलीची आई फॅक्टरीत नोकरीसाठी गेली होती.
[read_also content=”भितीदायक! कारच्या आतून बाहेर आला ३० किलोचा किंग कोब्रा, व्हिडिओ पाहून तुम्हालाही भितीने कापरं भरलं नाही तर नवलच https://www.navarashtra.com/viral/creepy-30-kg-king-cobra-came-out-from-inside-the-car-in-kerala-palakkad-vadakanchery-you-will-be-shocked-to-see-the-viral-video-nrvb-360526.html”]
अडीच वर्षांच्या मुलीची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी अमित मृतदेह कड़ेवर घेऊन घरातून बाहेर पडला. दरम्यानच्या काळात शेजारच्यांनी अमितला टोकलं, त्यावेळी त्यानं मुलगी आजारी असल्यानं तिला ह़ॉस्पिटलला नेत असल्याचं खोटं सांगितलं. या सावत्र मुलीच्या पोषणाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी त्यानं हे निर्घृण कृत्यं केल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
आरोपी अमित हा उ. प्रदेशचा रहिवासी आहे. गेल्या आठ महिन्यांपासून नोकरीच्या शोधात तो राजकोटला आला होता. फॅक्टरीत काम करताना रुक्मिणी नावाच्या तरुणीशी त्याचे प्रमेसंबंध निर्माण झाले. त्यांनी चार महिन्यांपूर्वी लग्न केलं होतं. रुख्मिणीची आधीच्या लग्नापासून असलेली एक मुलगीही होती. गेल्या दोन महिन्यांपासून अमित कामावर जात नव्हता. रुक्मिणीच त्याचा आणि मुलीचा खर्च करत होती.