लग्न चार दिवसांवर असतानाच बापाने लेकीच्या तोंडात गोळ्या घालून केली हत्या… (फोटो सौजन्य-X)
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका वडिलांनी पोटच्या मुलीला गोळ्या घालून घालून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. चार दिवसांनी 18 जानेवारीला मुलीचे लग्न होणार होते. मात्र त्यापूर्वीच 20 वर्षांच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येनंतर वडील 10 मिनिटे पिस्तूल फिरवत राहिला होता. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजता आदर्श नगर महाराजपुरात घडली.
घरात लग्नाची तयार सुरू होती. दुसऱ्याच दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. पाहुणे मंडळी घरात होती. मात्र, अचानक बंदुकीच्या गोळीच्या आवाज आला आणि लग्नाला चार दिवस शिल्लक असतानाच बापनेच लेकीचा खून केला. ही घटना ग्वाल्हेरमधील आहे. घटनेची माहिती मिळताच ग्वाल्हेरचे एसपी धरमवीर सिंग हे घटनास्थळी पोहोचले.
लग्नाच्या सर्व तयारी सुरू असतानाच मुलीच्या नकाराचा आणि हट्टीपणाचा इतका राग आला की त्याने त्याच्या २० वर्षांच्या मुलीची हत्या केली. जीव गमावलेल्या तनुला काहीतरी अनुचित घडण्याची पूर्ण भीती होती. दोन दिवसांपूर्वीच त्याने एक व्हिडिओ बनवून आपली भीती व्यक्त केली होती.मुलीने अवघ्या दोनच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता.
या ४८ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये तनुने सांगितले होते की ती दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते. तनु गुर्जर (वय 20) असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. वडील महेश सिंह याला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीने अवघ्या दोन दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ जारी केला होता की, त्यामध्ये म्हटले होते की….
“नमस्कार, माझे नाव तनु गुर्जर आहे, माझ्या वडिलांचे नाव महेश गुर्जर आहे, माझ्या आईचे नाव ममता गुर्जर आहे. मी आदर्श नगरची रहिवासी आहे. मला तुम्हाला सांगायचे आहे की माझे एका मुलावर खूप प्रेम आहे. आमच्या नात्याला सहा वर्षे झाली आहेत. सुरुवातीला माझ्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला होता, पण नंतर त्यांनी नकार दिला. आता ते मला रोज मारतात. तसेच जीवे मारण्याची धमकी देतात. मला प्रिय असलेल्या व्यक्तीचे नाव भिकम मावई आहे. तो आग्रा येथील रहिवासी आहे. माझा मृत्यू झाला किंवा मला काही झाले तर त्याला माझे कुटुंबीय जबाबदार असतील. कारण ते माझ्यावर रोज दुसऱ्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणतात, पण मी करू शकत नाही. ”
जिसके साथ रिश्ता तय किया गया उससे शादी से इनकार पर तनु को उसके पिता ने ही गोली मार दी। मध्य प्रदेश के ग्वालियर की रहने वाली 20 साल की तनु अपने प्रेमी से शादी करना चाहती थी। दो दिन पहले ही उसने वीडियो बनाकर पूरी बात बताई थी। pic.twitter.com/hXBu74otsR
— sudhir jha (@sudhir_jha_says) January 15, 2025
ग्वाल्हेरच्या महाराजपुरा आदर्श नगर येथील रहिवासी तनु गुर्जर यांचे वडील महेश सिंग महामार्गावर एक ढाबा चालवतात. आरोपीला तनुचे लग्न त्याच्या पसंतीच्या मुलाशी करायचे होते. लग्नाची तयारी जवळजवळ पूर्ण झाली होती. लग्नाची मिरवणूक १८ जानेवारी रोजी येणार होती. पण मुलगी अजूनही लग्नासाठी तयार नव्हती. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास, महेश हातात पिस्तूल घेऊन तनूच्या खोलीत गेला आणि तिच्या तोंडावर गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य पोहोचले तेव्हा तनुचा मृतदेह रक्ताने माखलेला होता. वडील देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन उभे होते आणि चुलत भाऊ राहुल पिस्तूल घेऊन उभा होता.
आपल्या मुलीला मारल्यानंतरही महेश बराच वेळ हातातली पिस्तूल हलवत राहिला. माहिती मिळताच पोलिस पोहोचले आणि त्यांनी आरोपीला कसेतरी ताब्यात घेतले. ग्वाल्हेरचे एसपी धर्मवीर सिंह आणि सीएसपी महाराजपुरा घटनास्थळी पोहोचले. नागेंद्र सिंह सिकरवार यांनी सांगितले आहे की, मुलीचा चुलत भाऊ राहुल देखील या घटनेत सामील आहे. आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे, तर चुलत भाऊ फरार आहे. मुलीला लग्न करायचे नव्हते, त्यामुळेच ही हत्या करण्यात आली. फॉरेन्सिक तज्ज्ञ ज्येष्ठ शास्त्रज्ञ अखिलेश भार्गव हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिस घटनास्थळाची चौकशी करत आहेत. हत्येच्या आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.