Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी; न्यायालयात नेमक कायं घडलं? उज्ज्वल निकमांनी संगळचं सांगितलं

बीडमधील संघटित गुन्हेगारी कशी फोफावली गेली, सुदर्शन घुले मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हेही न्यायालयात सांगितले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 26, 2025 | 05:13 PM
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी; न्यायालयात नेमक कायं घडलं? उज्ज्वल निकमांनी संगळचं सांगितलं
Follow Us
Close
Follow Us:

बीड: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज केज सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपला युक्तिवाद करत संतोष देशमुखांच्या हत्याकांडाचा घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला. याचवेळी त्यांनी त्यांच्या हत्याकांडाच्या मास्टरमाइंडची माहिती उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मांडली. तसेच, आरोपींच्या वकिलांना संबंधित सर्व कागदपत्रे सोपवण्यात आली. उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादानंतर आरोपींच्या वकिलांनी आपली बाजू मांडली.

बीड जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. वाल्मिक कराडपासून या प्रकऱणातील आरोपींनाव्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी बोलताना उज्वल निकम म्हणाले की, या प्रकरणातील गँग लीडर सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडने मार्गदर्शन केले असून, ही माहिती सीडीआर अहवालातून समोर आली आहे. 8 डिसेंबर 2024 रोजी नांदूर फाटा येथील हॉटेलमध्ये तिरंगा येथे वाल्मिक कराडसह आरोपींची बैठक पार पडली. संपूर्ण कट रचण्यामध्ये वाल्मिक कराडने महत्त्वाची भूमिका बजावली. या बैठकीला लीडर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि इतर आरोपी उपस्थित होते. वाल्मिक कराडनेच या बैठकीत संतोष देशमुख यांना धडा शिकवण्याची चर्चा केली.

Maharashtra Weather: ‘या’ जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; उन्हाच्या कडाक्याने महाराष्ट्र होरपळला

फरार आरोपी कृष्णा आंधळेने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना फोन केल्याचेही निकम यांनी सांगितले केला होता. सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेली कागदपत्रे आणि आवश्यक साहित्य पुरवण्यात आले. आरोपी कृष्णा आंधळेने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना तीन वेळा फोन केल्याचेही सीडीआरमधून स्पष्ट झाले आहे. तसेच, सुरुवातीला आवादा कंपनीच्या वॉचमनला सुदर्शन घुलेने मारहाण केल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपल्या युक्तिवादात नमूद केले.

महत्त्वाचे जे साक्षीदार आहेत त्यांची ओळख गोपनीय ठेवावी अशी आम्ही न्यायालयाकडे विनंती केली आहे. तसेच, या आरोपींची जी मालमत्ता जप्त करण्याची विनंती आम्ही न्यायालयाकडे केली आहे. सीआयडी, एसआयटीचे प्रमुख, त्यांचे सहकारीदेखील न्यायालयात हजर होते. आरोपींनाही त्यांना लागणाऱ्या आरोपांची पूर्तता केली आहे. आमच्याकडील उपलब्ध पुरावे आम्ही न्यायालयात सादर केली आहे. तसेच 8 ऑक्टोबर 2024 पासू संतोष देशमुख यांची हत्या झाली तो दिवस 9 डिसेंबर 2024 पर्यंतचा सर्व घटनाक्रम आम्ही न्यायालयात विषद केली आहे. प्रत्येक घटनेच्या तारखेचा आमच्याकडे पुरावा आहे.

Eknath Khadse : एकनाथ खडसे विधीमंडळातील कारभारावरुन कडाडले….; शंभूराज देसाईंवर साधला निशाणा

बीडमधील संघटित गुन्हेगारी कशी फोफावली गेली, सुदर्शन घुले मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हेही न्यायालयात सांगितले आहे. आरोपींच्या वकीलांना कागदपत्रे देण्यात आली आहेत. 10 एप्रिलाला पुढील सुनावणी होणार आहे. त्या दिवशी आरोपींवर कोणकोणते गुन्हे दाखल करावेत हे आम्ही न्यायालयात मांडणार आहोत.

Web Title: Hearing of santosh deshmukh case ujjwal nikam told the whole story of what really happened in the court nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 03:54 PM

Topics:  

  • Santosh Deshmukh

संबंधित बातम्या

सरपंच देशमुखांना मारण्यासाठी 4 जीवघेण्या हत्यारांचा वापर, अंगावर 150 जखमा; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर
1

सरपंच देशमुखांना मारण्यासाठी 4 जीवघेण्या हत्यारांचा वापर, अंगावर 150 जखमा; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

Ajit Pawar: “तुम्ही थोडासा धीर धरा, मी काय करतो….”; बीड दौऱ्यातून अजित पवारांचा सज्जड दम
2

Ajit Pawar: “तुम्ही थोडासा धीर धरा, मी काय करतो….”; बीड दौऱ्यातून अजित पवारांचा सज्जड दम

Manisha Bidve : अश्लील व्हिडिओ दाखवले, उठाबशा काढायला लावल्या, लैंगिक संबंध ठेवले; मनीषा बिडवेच्या हत्येचा खुलासा
3

Manisha Bidve : अश्लील व्हिडिओ दाखवले, उठाबशा काढायला लावल्या, लैंगिक संबंध ठेवले; मनीषा बिडवेच्या हत्येचा खुलासा

Kolhapur Rajesh Kshirsagar : प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडीस चांदीचा रथ अर्पण..
4

Kolhapur Rajesh Kshirsagar : प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडीस चांदीचा रथ अर्पण..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.