अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री उपस्थित नसल्याने एनसीपी नेते एकनाथ खडसे आक्रमक (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये सध्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. धनंजय मुंडे राजीनामापासून औरंगजेब कबर अशा अनेक मुद्द्यांमुळे अधिवेशन गाजले आहे. यामध्ये दिशा सालियन प्रकरण, अबू आझमी निलंबन तसेच प्रशांत कोरटकर अटक, नागपूर दंगल अशा अनेक मुद्द्यांवरुन अधिवेशन गाजले. राज्यात इतर महत्त्वाचे प्रश्न असताना औरंगजेब आणि कामराप्रकरणी चर्चा झाल्याने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केले. तसेच विधानसभेमध्ये मंत्री उपस्थित राहत नसल्याने देखील एकनाथ खडसे यांनी सरकारला खडसावले आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
अंतिम प्रस्तावावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मंत्र्यांच्या उपस्थितीव प्रश्न उपस्थित केले. एकनाथ खडसे म्हणाले की, “अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम प्रस्तावावर चर्चा असून ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हा आठवड्यामधील शेवटचा प्रस्ताव आहे. या महत्त्वाच्या प्रस्तावावेळी चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री हजर नाही. शंभूराज देसाई धावतपळत आले, याबद्दल मी अभिनंदन करतो. सरकार किती संवेदनशील आहे, याचा अनुभव आम्ही घेतो आहे,” असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खडसे म्हणाले की, “या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये सारेच विषय असतात, त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे. पण माहित आहे तुम्हाला खूप काम आहे, रात्रीचं खूप जागरण होतंय आणि जागरणामुळे सकाळी उठायला खूप वेळ होतो आहे. ब्रिफिंग तुम्हालाच असतं का? आम्हाला नसतात का कामं?”रात्री ब्रिफिंग घ्या,” असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.
📍विधान भवन, मुंबई ⏭️ 26-03-2025 अर्थसंकल्पीय अधिवेशन -2025 | अंतीम आठवडा प्रस्ताव अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतीम आठवडा चर्चेत सहभाग घेतला. भाग २ pic.twitter.com/zhyVG9Nj4P
— Eknath Khadse (@EknathGKhadse) March 26, 2025
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी टोला लगावल्यानंतर शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. यावेळी देसाई म्हणाले की, “विभागातून माहिती मिळवण्यासाठी वेळ होतो. बाकी काही नाही. मी वेळेत आलो होतो, लिफ्टमुळे वेळ झाल्याने दोन सेकंद उशीर झाला फक्त,” असं स्पष्टीकरण शंभुराज देसाईंनी दिलं आहे. यावर पुन्ह एकदा एकनाथ खडसे यांनी उत्तर दिले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ते म्हणाले की, “सर्व मंत्र्यांचं ब्रिफिंग नसतं. मी सुद्धा मंत्री राहिलेलो आहे. 15 वर्षे मी सुद्धा मंत्री होतो. पण जाऊ द्या. सरकार किती असंवेदनशील आहे याचं उदाहरण हे आहे. यातून हे दिसत आहे,” असा टोला एकनाथ खडसे यांनी महायुती सरकारला लगावला आहे.
एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “राज्य एकाबाजूला आर्थिक दिवाळखोरीत आहे, असं असतानाही राज्यातील आर्थिक घोटाळे थांबलेले नाहीत. परिवहन विभाग, आरोग्य खातं, विविध खात्यांमध्ये मोठे घोटाळे झाले आहेत. हे घोटाळ्यांचं सरकार आहे. ३२ हजार कोटींचे घोटाळे होतात आणि मुख्यमंत्र्यांना त्याचं ज्ञान असतं हे राज्याचं दुर्दैवं आहे,” असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.