
Honey Trap Case Video:
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून एका अनोळखी महिलेचे विविध क्रमांकांवरून संदेश आणि आक्षेपार्ह फोटो येत होते. या महिलेने पाटील यांच्याकडे एक लाख, दोन लाख आणि नंतर पाच लाख अशा हफ्त्यामंध्ये खंडणीची मागणी केली. पण महिलेचा त्रास सातत्याने वाढत असल्यामुळे त्यांनी महिलेला ब्लॉक केले. त्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महिलेने दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधन शिवाजी पाटील यांना अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवण्यास सुरूवात केली. पैसे न दिल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करून त्यांची प्रतिमाही मलिन करण्याची धमकी तिने दिली. अखेर शिवाजी पाटलांना यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
अलीकडच्या काळात अनेक राजकारणी आणि उद्योगपती हनी ट्रॅप रॅकेटच्या जाळ्यात अडकले आहेत. मात्र, या प्रकरणात पोलिसांच्या तत्परतेमुळे आमदार पाटील योग्यवेळी सावध झाले आणि मोठा अनर्थ टळला. तपास अधिकारी संबंधित कार्यालय आणि आरोपींच्या संपर्क साखळीचा मागोवा घेत आहेत.
या सगळ्या प्रकाराला त्रासलेल्या आमदार पाटलांनी ८ ऑक्टोबरला पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तापासानुसार हा प्रकार हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे समोर आले आहे. आरोपी महिलेचा शोध पोलिसांनी सुरू केल आहे.