सौरव गांगुली(फोटो-सोशल मीडिया)
Sourav Ganguly comments on Rohit Sharma : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्याट दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात असून यातील एक सामना जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दूसरा सामना उद्या दिल्ली येथे खेळला जाणार आहे. या मालिकेयानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या सामन्यांसाठी आधीच भारतीय संघ जाहीर केला गेला आहे. या सामन्यात शुभमन गिलकडे संघाचे नेतृत्व दिले आहे. या मालिकेत रोहित शर्मा खूप दिवसांनी एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करणार आहे.
या मालिकेतच्या निमित्त रोहित शर्मा आणि शुभमन गिलची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. यामागील कारण म्हणजे टीम इंडियाचे एकदिवसीय कर्णधारपद रोहितऐवजी गिलकडे सोपवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आशाच आता, माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने यावर भाष्य केले आहे. त्याने शुभमन गिलकडे भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले असून हा निर्णय योग्य असल्याचे देखील म्हटले आहे.
हेही वाचा : IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल दिल्ली जिंकणार? डॉन ब्रॅडमनशी नाव जोडून रचणार इतिहास
सौरव गांगुलीने एका कार्यक्रमात म्हटले की, “मला वाटते की हा निर्णय रोहितशी बोलल्यानंतर घेतला गेला आहे. मला त्यात कोणतीही अडचण दिसून येत नाही. रोहित खेळत राहू शकतो आणि दरम्यान, एका तरुण कर्णधाराला तयार करण्यात येत आहे.” त्याने असे देखील म्हटले की, हे पाऊल संघाच्या भविष्याकडे निर्देश करते, विशेषतः दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या २०२७ च्या विश्वचषकाचा विचार करता हा निर्णय योग्य आहे. त्यावेळी रोहित शर्मा ४० वर्षांचा असेल आणि विराट कोहली देखील एका महत्त्वाच्या वयात असंर आहे.
सौरव गांगुलीने ही देखील स्पष्ट केले की हा निर्णय बाद फेरीचा नाही. तो म्हणाला की, “रोहितने अलिकडच्या काळात टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आपली कामगिरी सिद्ध करून दाखवली आहे. निवडकर्त्यांकडून ही देखील पाहिले असेल की भविष्यात संघात संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.” तसेच गांगुली पुढे म्हणाला की, वय आणि तंदुरुस्ती शेवटी खेळात खेळाडूचे भविष्य ठरवत असते. “रोहित आणि विराटला घरगुती क्रिकेटमध्ये सक्रिय राहावे लागणार आणि ते किती तंदुरुस्त आणि स्पर्धात्मक आहेत हे पहावे लगता असते. क्रिकेटमध्ये, प्रत्येक खेळाडूला एके दिवशी निवृत्त व्हावेचे लागते.”
हेही वाचा : IND W vs SA W: 4 धावांनी शतकाला हुलकावणी, तरी घातली इतिहासाला गवसणी; भारताच्या रिचा घोषने केला ‘हा’ कारनाम