Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujarat: वापीमध्ये ड्रग्जचा मोठा साठा उघड! ATSच्या छाप्यात ३० कोटींचे MD ड्रग्ज जप्त तर ३०० किलो….

आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत अंदाजे ३० कोटी रुपये आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, ड्रग्ज निर्मितीसाठी वापरण्यात येणारा ३०० किलोग्रॅम कच्चा माल आणि अनेक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 03, 2025 | 09:07 PM
गुजरातमध्ये ड्रग्जचा मोठा साठा उघड! (Photo Credit- X)

गुजरातमध्ये ड्रग्जचा मोठा साठा उघड! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • गुजरातमध्ये ड्रग्जचा मोठा साठा उघड!
  • ATSच्या छाप्यात ३० कोटींचे MD ड्रग्ज जप्त तर ३०० किलो…
  • ३०० किलो कच्चा माल आणि उपकरणे जप्त

गुजरात: गुजरात दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि दमन गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत वलसाड जिल्ह्यातील वापी येथून सुमारे ६ किलोग्रॅम मेफेड्रोन (MD) ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत अंदाजे ३० कोटी रुपये आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, ड्रग्ज निर्मितीसाठी वापरण्यात येणारा ३०० किलोग्रॅम कच्चा माल आणि अनेक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.

फार्म हाऊसमध्ये ड्रग्ज निर्मिती, वापीत साठा

एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी मेहुल ठाकूर, विवेक राय आणि मोहनलाल पालीवाल हे दमनजवळील एका फार्म हाऊसमध्ये ड्रग्जची निर्मिती करत होते. तयार झालेला माल वापी येथील चला रोड परिसरात मनोज सिंग ठाकूर यांच्या बंगल्यात साठवला जात होता.

या माहितीच्या आधारे गुजरात एटीएसने दमन गुन्हे शाखा आणि वलसाड स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) सोबत संयुक्तपणे वापीतील बंगला आणि दमनमधील फार्म हाऊसवर छापे टाकले.

  • वापीतून जप्ती: बंगल्याच्या तपासणीदरम्यान पोलिसांना ५.९ किलोग्रॅम तयार एमडी ड्रग्ज जप्त केले.
  • निर्मितीचा पर्दाफाश: फार्म हाऊसवर ड्रग्ज निर्मितीचे काम सुरू असल्याचे पथकाला आढळले.
Daman, Gujarat: ATS, along with Valsad SOG and Daman Police, busted a major MD drugs racket in simultaneous raids at Vapi’s Chala area and Daman. Over 5.9 kg of MD drugs worth ₹30 crore was seized from a bungalow in Chala. One accused, Mohan Paliwal, was arrested while two… pic.twitter.com/MpPGRt4RQR — IANS (@ians_india) October 3, 2025

Surat: संतापजनक! जन्मदात्या आईनेच मुलाला १३ व्या मजल्यावरुन फेकलं, अन् नंतर स्वत:ही… घटना CCTV मध्ये कैद

३०० किलो कच्चा माल आणि उपकरणे जप्त

दमन येथील फार्म हाऊसवरील कारवाईत ड्रग्ज निर्मितीसाठी वापरण्यात येणारा मोठ्या प्रमाणात कच्चा माल जप्त करण्यात आला.

  • कच्चा माल: फार्म हाऊस मधून जवळपास ३०० किलोग्रॅम एमडी ड्रग्ज निर्मितीसाठीचे विविध रसायने आणि केमिकल्सचा साठा सापडला. यामध्ये २५ किलोग्रॅम बोरोकेमिकल, ५० किलोग्रॅम कॉस्टिक सोडा, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि मीठाचे पॅकेट्स तसेच २५-लिटरचे १० केमिकलचे ड्रम आणि अनेक रिकामे कंटेनर जप्त करण्यात आले.
  • उपकरणे: ड्रग्ज बनवण्यासाठी वापरले जाणारे ग्राइंडर, मोटर, ग्लास फ्लास्क, मीटर आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. एमडी ड्रग्ज बनवण्याची ही उपकरणे बमन पजऊ येथील मेडिकल स्टोअरमधून आणल्याचे तपासात उघड झाले.

एक आरोपी ताब्यात, दोन प्रमुख फरार

एटीएसने गुरुवारी रात्री छापा टाकून आरोपी मोहनलाल पालीवाल याला अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी मेहुल ठाकूर आणि केमिस्ट विवेक राय हे दोघेही फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. दमन गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे आणि फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

मृत्यूचं इंजेक्शन! १९ वर्षीय तरुणाच्या प्राईव्हट पार्टमध्ये दिलं इंजेक्शन , तपासात समोर आलं असं कारण की वाचून हादराल…

Web Title: Huge drug cache uncovered in gujarat md drugs worth 30 crores seized in ats raid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 09:07 PM

Topics:  

  • Drugs
  • Gujarat
  • Nation News

संबंधित बातम्या

Karur Stampede: “चेंगराचेंगरीनंतर गायब झाले, यातून तुमची…!” मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता विजयला फटकारले
1

Karur Stampede: “चेंगराचेंगरीनंतर गायब झाले, यातून तुमची…!” मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता विजयला फटकारले

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral
2

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका
3

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका

Andhra Pradesh News: हिंसाचाराच्या घटनांनंतर आंध्र प्रदेश सरकार सतर्क; सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी उचलले कठोर पाऊल
4

Andhra Pradesh News: हिंसाचाराच्या घटनांनंतर आंध्र प्रदेश सरकार सतर्क; सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी उचलले कठोर पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.