Western Coalfield Limited employee commits suicide by strangulation at Bhadravati
मुंबई आयआयटी एका विद्यार्थ्याने रविवारी कॅम्पसमधील वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता आयआयटी मद्रासच्या एका पीएचडी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सचिन कुमार जैन (वय,32) असं मृत विद्यार्थ्याच नाव असून तो मुळचा पश्चिम बंगालचा रहिवसी होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
[read_also content=”राज्यात वाढतोय कोरोना! दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याची कोविड टास्क फोर्सची सूचना https://www.navarashtra.com/maharashtra/covid-task-force-instructions-to-test-passengers-coming-from-dubai-and-china-nrps-380118.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापिठाच्या मेकॅनिकल विभागातील सचिन कुमार जैन हा पीएचडी रिसर्च स्कॉलर होता. त्याने व्हॉट्सअॅप स्टेटसवर स्टेटसमध्ये मेसेज लिहिला होता, मला माफ करा, मी पुरेसा चांगला नाही’ अस मेसेज त्याने लिहिलां. सचिनच्या मित्रांनी हा मेसेज पाहिल्यानंतर ते धावत त्याच्या खोलीच्या दिशेने गेले. तेव्हा त्याने गळफास घेतला होता. त्याला रुग्णालयात तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. त्याने लिहिलेल्या मेसेजची सध्या पोलिस चौकशी करत आहेत.
यापूर्वी, आयआयटीएममधील दोन बीटेक विद्यार्थ्यांनी यावर्षी आत्महत्या केली होती. तसेच, गेल्या 5 वर्षांत IIT, NIT, IIM मध्ये तब्बल 61 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. 2023 च्या केवळ अडीच महिन्यांत, सहा आयआयटी आणि एनआयटी विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव घेतला आहे, असे महित समोर आली आहे.