Karnala Bank Scam: नवी मुंबईतून महत्त्वाचीअपडेट समोर आली आहे. मुंबईतील कर्नाळा बँकेत आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. कर्नाळा बँकेतील ठेवीदार आणि गॅरेंटरचे पैसे परत करण्यात बँकेचे अध्यक्ष आमदार विवेक पाटील यांची मालमत्ता लिलावात काढण्याचे आदेश अंमलबजवणी संचलनालय ( ED)च्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. पनवेल येथील प्रसिद्ध कर्नाळा स्पोर्ट्स अॅकॅडमी आणि पोसरी येथील १०२ एकर जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावातून आलेल्या रकमेतून गैरव्यवहारातील रक्कम वसूल केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील चार वर्षांपासून विवेक पाटील ५०० कोटींच्या घोटळ्याप्रकरणी तळोजा कारागृहात आहेत. विवेक पाटील यांनी इडी’च्या पीएमएलए न्यायालयात त्यंच्या ८७ मालमत्तांचा लिलाव करून त्यातून पैसे उभारण्यात यावेत, अशी विनंती केली आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यात कर्नाळा स्पोर्ट्स अॅकॅडमी आणि पोसरी येथील त्यांची १०२ एकर जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यातील पोसरीतील जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया सर्वात आधी केली जाणार आहे.
Mantralay News: मंत्रालयातील ठराविक अधिकाऱ्यांसाठी बदलले निकष; उपसचिवांचा संताप अन् थेट इशारा
यासोबतच विमा कंपन्यांचे ३८० कोटी आणि उर्वरित ठेवीदारांचे १७८ कोटी आणि बँकेचा ताळेबंद कर्मचाऱ्याची थकबाकी, इनकम टॅक्सच्या रकमा देण्यासाठी पीएमएलए कायद्यानुसार, कर्नाळा अॅकॅडमी आणि पोसरी येथील 103 एकर जमिनीचा लिलाव करून लिलावात काढली जाणार आहे. यातून सर्वांचे पैसे परत दिले जाणार आहेत. कर्नाळा बँँक आर्थिक घोटाळा ५०० कोटींचा असून ठेवीदारांच्या आणि कंपन्यांच्या पैशाचा गैरवापर झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना आरोपी करण्यात आलं आहे.
कर्नाळा नागरी सहकारी बँक (Karnala Cooperative Bank) ही रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध बँक होती. मात्र, चार वर्षांपूर्वी या बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. तत्कालीन भाजप नेते किरीट सोमय्या यांनीच या अध्यक्ष विवेक पाटील यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप केले होते. त्यानंतर झालेल्या तपासात सहकार खाते आणि रिझर्व्ह बँकेच्या ऑडिटमध्ये बँकेत करोडो रुपयांची बेनामी खाती असल्याचे उघडकीस आले.
आरोपानुसार, विवेक पाटील यांनी बेनामी खातेधारकांच्या नावाने खाती उघडून त्यात कर्जाच्या स्वरूपात करोडो रुपये जमा केले आणि ती रक्कम स्वतःच्या मालकीच्या ट्रस्टकडे वळवली. या घोटाळ्याचा भाजप नेते किरीट सोमय्या तसेच भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल) आणि महेश बालदी (उरण) यांनी सातत्याने पाठपुरावा केला. गेल्या वर्षी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी आरबीआयच्या विशेष ऑडिटचा दाखला देत विवेक पाटील दोषी असल्याचे म्हटले होते. सध्या या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आली आहे.