फोटो सौजन्य - AI
पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?
दोन्ही आरोपींविरुद्ध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला गेल्या काही काळापासून पतीपासून वेगळी राहत होती. ती नयानगर परिसरात आपल्या २२ वर्षीय मुलासह तसेच १३ आणि १० वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींसोबत राहत होती. मार्च महिन्यात दोन्ही मुली गाढ झोपेत असताना महिलेने त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ तिने आपल्या प्रियकराला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवले.
पीटीच्या तासाला बोलल्यामुळे 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली असता पोलिसांना आणखी धक्कादायक माहिती मिळाली. संबंधित महिलेने केवळ आपल्या मुलींचेच व्हिडिओ रेकॉर्ड केले नाहीत, तर आरोपी प्रियकरासोबतचे तसेच अन्य काही व्यक्तींचेही व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ते एकमेकांना शेअर केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही पोलिसांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. या प्रकरणातील डिजिटल पुरावे, मोबाईलमधील व्हिडिओ तसेच ते कोणाला आणि कशा पद्धतीने पाठवण्यात आले, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या घटनेमुळे नयानगर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलींचे संरक्षण आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






